हर्षवर्धन पाटील लेकीसह राज ठाकरेंना भेटले !

हर्षवर्धन पाटील लेकीसह राज ठाकरेंना भेटले !

मुंबई -

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी हर्षवर्धन पाटील लेकीसह जाऊन भेटले.हर्षवर्धन पाटलांनी कन्या अंकित पाटील यांच्या लग्नाची पत्रिका राज ठाकरे यांना दिली. अंकिता पाटील यांनी फेसबुकवरुन राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी अंकिता पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे.

अंकिता पाटील या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकलं. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. 2014 च्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया या सर्व जबाबदाऱ्या अंकिता पाटील यांच्याकडे होत्या. त्यानंतरच्या काळात खासगी साखर उद्योगाच्या  संघटनेतही त्यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.