ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने एक लाख ६० हजारांची फसवणूक

ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने एक लाख ६० हजारांची फसवणूक

 पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर फॉलो करण्यास सांगत तसेच काही रक्कम देऊन आणखी पैशांची मागणी करत एक लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना २५ जून ते ११ जुलै २०२३ या कालावधीत खेड तालुक्यातील महाळुंगे येथे घडली.

याप्रकरणी महिलेने मंगळवारी (दि. २९) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीस व्हाट्स अप वर संपर्क करून दिवसाला पाच हजार रुपये कमावण्याची संधी असल्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला फिर्यादीस काही रक्कम पाठवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जास्त पैशांची मागणी करत वेगवेगळे टास्क दिले. फिर्यादी यांच्याकडून टास्कच्या बहाण्याने एक लाख ६० हजार रुपये घेत फसवणूक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.