महापौर, आदर्श रामराज्याच्या गप्पा मारण्यापेक्षा आधी ‘कौसल्यामाई’ बना …!

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महापौर, आदर्श रामराज्याच्या गप्पा मारण्यापेक्षा आधी ‘कौसल्यामाई’ बना …!

पिंपरी, दि.  मार्च -

रामायणात माता कौसल्येने आपल्या पुत्राला अवघ्या राज्यातील प्रजेचं हित करण्याचे संस्कार दिले होते, तर पुत्रप्रेमात आंधळ्या झालेल्या कैकयीने केवळ आपल्याच पुत्राला राज्य प्राप्त व्हावं म्हणून कट-कारस्थान रचले ! मातेची ही परस्परभिन्न रूपं आठवण्याचं कारण म्हणजे आपल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रथम नागरिक अर्थात ‘माई’ उर्फ उषा ढोरे यांची एकामागून एक बेजबाबदार वक्तव्यं ! अवघ्या उद्योगनगरीने ज्यांना ‘माई’ अर्थात मातेचं स्थान दिलं आहे, त्या मातेने खऱ्या अर्थाने ‘कौसल्या’माईची भूमिका वठविण्याची गरज होती. कारण महापौर म्हणजे शहराच्या प्रथम नागरिक असतात. महापौर असणाऱ्या ‘माई’ ने संपूर्ण शहराच्या विकासाला, नागरिकांच्या अडी-अडचणींना बाजूला ठेवून केवळ सत्तेच्या लोभापायी आपल्याच स्वपक्षाच्या मंडळींना (लाचखोर, खंडणीखोरांना वाचविण्यसाठी) झुकतं माप देत विरोधी पक्षासोबतच शहरवासियांनाही ‘सवता-सुभा’ दाखवून दिलाच !

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सदस्यांची मुदत १३ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे महापालिका विसर्जित होईल आणि प्रशासक येणार आहे. त्यामुळे १७ मार्चची सभा होऊ शकणार नाही. १८ फेब्रुवारीची सभा विद्यमान नगरसेवकांची शेवटची महासभा ठरणारी असतानाही ती सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे विशेष महासभा घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी महापौर माईंकडे केली होती. मात्र, महापौरांनी ती मागणी फेटाळून लावली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर योगेश बहल यांनी महापौरांकडे पुन्हा एकदा ही विशेष सभा घेण्याची पत्राद्वारे विनंती केली. यावर माई ढोरे यांनी ‘उद्या यांनी शनिवारवाडा मागितला तर तो ही द्यायचा का?’ असे हास्यास्पद वाक्य केले आणि विशेष महासभेची मागणी धुडकावून लावली! महापौरपदी असणाऱ्या ‘माई’सारख्या जबाबदार व्यक्तीचे इतके बेजबाबदार वाक्य म्हणजे पिंपरी-चिंचवड शहराचेच दुर्दैवच म्हणावं लागेल!

भ्रष्टाचार, विकासकामे यासह इतर मुद्यांवर या सभेमध्ये चर्चा करणे अपेक्षित आहे. या मुद्यांवर चर्चा घडून आल्यास नागरिकांमध्ये असलेले समज-गैरसमज दूर होण्यास मदत होईल. विशेषकरुन भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चा व्हावी. सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे शहरातील विकासकामांबाबतचे मुद्दे, भय, भ्रष्टाचार आणि विकास या मुद्यांवर देखील चर्चा होण्यासाठी महासभेचे आयोजन करावे, अशी विनंती विरोधी पक्षाने केली तर त्यात गैर काय? मात्र, ‘महापौर’ या पदाचे महत्त्वच धुळीस मिळविणाऱ्या ‘माईं’नी या विशेष सभेचीही त्यांच्या वकुबाप्रमाणेच मागणी फेटाळून लावली.

पाच वर्षांपूर्वी महापालिकेवर भगवा फडकवून कारभार हाती घेतलेल्या भारतीय जनता पार्टीने पाच वर्षात किती ‘निर्विघ्न’ कामगिरी बजावली हे पिंपरी-चिंचवडमधील सुज्ञ जनतेपासून लपून राहिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने करून ठेवलेल्या विकासकामांच्या ‘आयत्या पिठावर’ केवळ ‘रेघोट्या’ मारण्याचे काम या ‘नवसत्तातुरांनी’ केल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहेच ! दिल्लीपासून गल्लीपर्यंत ‘या हाताची थुंकी त्या हातावर’ करण्याची अचाट कला नसानसातून वाहणाऱ्या भाजपच्या गुणधर्माला जागून गेली पाच वर्षे बिनबोभाट कारभार सुरू ठेवण्याचे काम इथेही ‘निर्विघ्नपणे’ पार पडलेच की !  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांच्या विचारसरणीनुसार आणि ध्येयधोरणानुसार वर्तन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कामात सुरुवातीला कधीही विनाकारण विघ्न आणले नाही. शहरविकासालाच प्राधान्य दिले असल्यामुळे नवख्या पदाधिकाऱ्यांना दोन वर्षे त्यांच्या पद्धतीने काम करू दिले. मात्र जसजसे भाजपच्या भ्रष्ट कारभारावरून पडदा उठत गेला, तसतसे राष्ट्रवादी काँग्रेसने चुकीच्या कामांना जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली. भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष लाच घेताना पकडले जातात.. माजी उपमहापौरांना खंडणी घेतल्याच्या आरोपावरून अटक होते.. जमीन बळाकाविल्याप्रकरणी भाजपाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल होतो, ठेकेदारांकडून कोट्यवधींच्या रक्कमा हे लोक स्विकारत होते त्यावेळी या ‘माईं’नी महाभारतातल्या ‘गांधारी’सारखी डोळ्यावर पट्टी का लावून घेतली ? इथेच मोठी गोम (की गेम?) आहे ! आपल्या लेकरावर संस्कार न करता त्याच्या चुकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आईचे कान शेवटी त्याच लेकराने कापले होते, ही गोष्ट ‘माई’ विसरल्या का? लाचखोरी, खंडणीखोरी, ब्लॅकमेलिंग या प्रकारात भाजपचे मोठे पदाधिकारी जेल मध्ये गेले, यापेक्षा पिंपरी-चिंचवड शहराची अधिक नाचक्की ती काय? 

शहरातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांचे विविध प्रश्न, शहराच्या प्रगतीसाठी उपाययोजना यापेक्षा सतत बेताल, बिनबुडाचे वक्तव्य करीत ‘खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं’ करण्यात भाजपचे पदाधिकारी गुंतलेले दिसतात. पाच वर्षांपूर्वी देशभरात आलेल्या ‘मोदी लाटे’मुळे सत्तांतराची चाहूल लागलेल्या माई ढोरेंसारख्या काही चाणाक्ष मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाव सोडून ‘भाजपा’च्या वेगवान जहाजावर उडी घेतली ! पण दुर्दैवाने पाच वर्षात अनपेक्षित मिळालेल्या संधीचे सोने तर करणे तर दूरच, पण संपूर्ण शहराचे ‘मातेरे’ करण्यात या मूळच्या ‘कुंपणा’वरील मंडळींनी कसर सोडली नाही ! आता यांच्याच पावलावर पाऊल टाकीत सत्तांतराची चाहूल लागलेल्या यांच्याच पक्षातील काही ‘अतिचाणाक्ष नवनेतृत्वां’नी यांच्याच कारभारावर जहाल टीका करत जाहीरपणे ‘भाजप पक्षातील भ्रष्ट कारभाराला आणि भ्रष्ट नेत्यांना’ कंटाळून पक्ष त्याग करत असल्याचा बोभाटा सुरू केला आहे !

पिंपरी-चिंचवड शहरात पाच वर्षे ‘निर्विघ्नपणे’ काम करणाऱ्या भाजपचे ढोंग आणि सोंग लपून राहिलेले नाही. सत्ताधारी पक्षाने पाच वर्षात महापालिकेची कशी वाट लावली आहे हे न समजण्याइतपत शहरातील नागरिक अजाण नाहीत. खरी विकासकामे कुणी केली आणि आयत्या पिठावर रेघोट्या कोण ओढतंय हे सुज्ञ नागरिक नक्कीच जाणतात. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपच्या ‘भय’ आणि ‘भ्रष्टाचारयुक्त’ कामकाजाला कंटाळलेली जनता येत्या निवडणुकीत त्यांची खरी जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही !  

आदरणीय माईंना महापालिकेच्या विशेष सभेची इतकी भीती का वाटते? विरोधकांच्या विशेष सभेच्या मागणीला नकार देतानाही त्या इतक्या का बिथरल्या? सत्तांतराच्या चाहुलीने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळेच पाय घसरण्याअगोदरच त्यांची जीभ घसरली असेल का? पुण्यातील शनिवारवाड्याचे महत्त्व न जाणता थेट पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विशेष सभेशी त्याचा ‘बादरायण’ संबंध जोडणाऱ्या महापौर ‘माईं’च्या अचाट तर्कावर हसावे की रडावे? हे आणि असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडले आहेत. 

आपली पापं झाकली जावीत म्हणून विरोधी पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांबाबत ‘खासगीत झालेल्या चर्चेसारखी’ नावे देऊन गैरसमज निर्माण करणे, त्यांच्यात फूट पाडणे, बिनबुडाचे आरोप करणे, रेटून रेटून खोटं बोलणे, सतत विरोधकांनाच चुकीचे दाखविणे ही भाजप पक्षाची ‘राष्ट्रीय परंपरा’ सचोटीने पाळणाऱ्या आदरणीय महापौर ‘माई’ आता तरी भानावर या !  रामायणातली स्वार्थी ‘कैकयी’ होण्याऐवजी पक्षभेद बाजूला ठेवून नागरिकांच्या सर्वोच्च हितासाठी केवळ आदर्श राजराज्याच्या गप्पा मारण्यापेक्षा व्यापक जनहित पाहणाऱ्या ‘कौसल्ये’प्रमाणे संपूर्ण शहराच्या ‘माई’ बना, हीच माफक अपेक्षा !