तडीपार गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक

तडीपार गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक

पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असताना त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याने शस्त्र बाळगले. याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करत पोलिसांनी तडीपार गुंडाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 30) सायंकाळी चौधरी पार्क रोडवर वाकड येथे करण्यात आली.

करण सुबेदार जैसवार (वय 25, रा. गणेशनगर, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार कौंतेय खराडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 20 एप्रिल 2023 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवनगी न घेता शहरात आला. त्याने स्वतःजवळ कोयता हे शस्त्र बाळगले. कोयता बाळगून तो परिसरात दहशत पसरवित असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला शस्त्रासह अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.