धुळे नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकीत भाजप खासदारांची प्रतिष्ठा धुळीस; तीन माजी आमदारांनी विजयश्री खेचली 

धुळे नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकीत भाजप खासदारांची प्रतिष्ठा धुळीस; तीन माजी आमदारांनी विजयश्री खेचली 

धुळे -

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये धुळ्याचे भाजपचे खासदार सुभाष भामरे यांना मोठा धक्का बसला आहे. सुभाष भामरे यांच्या भावाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या निवडणुकीत तीन माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी त्याचबरोबर धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे या तीनही माजी आमदारांनी घवघवीत विजय मिळवला आहे. 

निवडणुकीदरम्यान भाजप,काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे बघायला मिळाले. तर. शिवसेनेने मात्र वेगळी चूल मांडल्यामुळे यामध्ये सर्वपक्षीय आघाडीत शिवसेनेतर्फे बिघाडी करण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपच्या आठ उमेदवारांचा विजय झाला असून इतर नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार विजय झाले आहे.

धुळे नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकीमध्ये माजी मंत्री तथा आमदार अमरीश भाई पटेल यांनीदेखील या निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता. तसेच माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्वाधिक उमेदवार असल्या कारणाने धुळे-नंदूरबार जिल्हा बँकेच्या सत्तेची चावी पुन्हा एकदा राजवर्धन कदमबांडे यांच्याच हातात जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नऊ मतदार संघातील 17 जागांसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली. 17 पैकी दहा जागांसाठी मतदान झालं होतं. 17 पैकी 7 जागांवर बिनविरोध निवड झाली होती.