सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये कलाकारांचे मृतदेह पुरले? शेजाऱ्याच्या आरोपावर सलमान म्हणाला... 

सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये कलाकारांचे मृतदेह पुरले? शेजाऱ्याच्या आरोपावर सलमान म्हणाला... 
मुंबई -
 
अभिनेता सलमान खान आणि त्याचा शेजारी केतन कक्कर यांच्यातील भांडण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. लाइव्ह लॉच्या वृत्तानुसार, सलमानचे वकील प्रदीप गांधी यांनी गुरुवारी कोर्टासमोर केतन कक्करची पोस्ट आणि मुलाखत वाचून दाखवली. सलमानचा डी गँगच्या लोकांसोबत संबंध असल्याचा केतनचा आरोप आहे. त्याने सलमानच्या धर्मावरही भाष्य केले. तसेच सलमान केंद्रातील पक्ष आणि राज्य पातळीवरील राजकारण्यांच्या जवळ असल्याचेही त्यांनी सांगितले. तर सलमान चाइल्ड ट्रॅफिकिंगमध्ये गुंतलेला असून त्याच्या फार्म हाऊसवर चित्रपट कलाकारांचे मृतदेह पुरले जातात, असे केतन यांनी म्हटले आहे.  

यावर सलमान खानने प्रत्युत्तर दिले आहे. या सर्व आरोपांचा कोणताही पुरावा नाही. मालमत्तेच्या वादात तुम्ही माझी वैयक्तिक प्रतिमा का खराब करत आहात? तुम्ही माझ्या धर्मात का ढवळाढवळ करत आहात? माझी आई हिंदू आहे, माझे वडील मुस्लिम आणि माझ्या भावांनीही हिंदूशी लग्न केले आहे. आम्ही  सर्व सण साजरे करतो, असे सलमानने आपल्या वकिलांमार्फत म्हटले आहे.

मुंबईतील वांद्रे उपनगरात राहणाऱ्या सलमान खानचे रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे फार्महाऊस आहे. मुंबईचे रहिवासी असलेले कक्कड सलमान खानच्या फार्महाऊसशेजारी एका टेकडीवरील प्लॉटचे मालक आहेत. सलमानच्या दाव्यानुसार, केतनने युट्युबरशी बोलताना त्याच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती.

सलमान खानने यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि गुगल सारख्या सोशल मीडिया साइट्सलाही पक्षकार बनवले आहेत आणि त्यांना त्यांच्या वेबसाइट्सवरून बदनामीकारक मजकूर काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे. केतन यांना सलमान किंवा त्याच्या फार्महाऊसबद्दल बदनामीकारक मजकूर प्रकाशित करण्यापासून रोखणारा कायमचा आदेश देण्यात यावा अशी सलमानची मागणी आहे.