नाशिक साहित्य संमेलनातील दोघांना कोरोनाची लागण ; दोघांनाही पाठवले माघारी 

नाशिक साहित्य संमेलनातील दोघांना कोरोनाची लागण ; दोघांनाही पाठवले माघारी 
नाशिक -
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या साहित्य संमेलनाच्या समारोपादिनी म्हणजेच रविवारी (दि. ५) कोरोनाचे दोन रुग्ण सापडले. त्यामुळे साहित्य नगरीत खळबळ उडाली . हे दोन्ही रुग्ण पुण्याहून आले होते. त्यांची टेस्ट केली असता ते पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना साहित्य संमेलनात प्रवेश नाकारण्यात असून त्यांना परत पुण्याला पाठवण्यात आलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये साहित्यिकांचा मेळा भरला आहे. या साहित्य संमेलानासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो लोक आले आहेत. मात्र, प्रत्येकाची कोविड चाचणी करूनच त्यांना आत सोडलं जात आहे. आजही साहित्य संमेलनाला आलेल्यांची तपासणी करून आत सोडले जात असताना दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आले. त्यामुळे या दोघांना संमेलनस्थळी प्रवेश नाकारण्यात आला. हे दोघेही पुण्याहून आले होते. त्यांना परत पुण्याला पाठवण्यात आले. मात्र, हे दोन रुग्ण आढळल्याने संमेलन स्थळी एकच खळबळ उडाली होती.