पुण्यात आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

      पुणे, (प्रबोधन न्यूज ) -    खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याने बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीने चिरडल्याची घटना समोर येत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे हा अपघात झाला.

दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ओम सुनील भालेराव (वय १९) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्री पुणे-नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत होता. तो विरुद्ध दिशेने सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारने धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.