अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी

अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी


दौंड - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊ तथा दौंड साखर कारखान्याचे अध्यक्ष जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने गुरुवारी छापा टाकला.

पुण्यातील सिंध कॉलनीत कदम यांचे घर असून ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी सकाळीच त्यांच्या घरी छापेमारीसाठी दाखल झाले. दौंड साखर कारखान्यावर यापूर्वी ७ ऑक्टोबर रोजी आयकर विभागाचा छापा पडला होता. यापूर्वी अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींचे दौंड शुगर, अंबालिका, शुगर, जरंडेश्वर साखर कारखाना, पुष्पदनेश्वर शुगर व नंदुरबार खासगी साखर कारखान्यांवरही आयकर विभागाने कारवाई केली होती.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांत आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप केलेला आहे.