वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेस अटक

वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेस अटक

  पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका महिलेला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 29) रात्री नऊ वाजताच्या सुमारास स्पाईन रोड, मोशी येथे करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला अन्य दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती. त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपी महिला आपली उपजीविका भागवत होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करत महिलेला अटक केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.