गायीच्या शेणाने आता आकाशात झेपावणार रॉकेट!

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गायीच्या शेणाने आता आकाशात झेपावणार रॉकेट!

टोकीयो , (प्रबोधन न्यूज ) -  आतापर्यंत गायीच्या शेणाचा वापर केवळ, खत, स्वयंपाकाचा गॅस आणि विविध धार्मिक विधीं यांसारख्या कामांतच होत होता. मात्र आता याचा वापर रॉकेटला अवकाशात पाठवण्यासाठीही केला जाऊ शकतो. जपानमधील अभियंत्यांनी गायीच्या शेणापासून मिळणा-या लिक्विड बायो मिथेनवर चालणा-या एका नवीन प्रकारच्या रॉकेट इंजीनचे परीक्षण केले आहे. यामुळे अधिक टिकाऊ प्रोपेलेंट विकसित होऊ शकते.

यासंदर्भात माहिती देताना स्टार्टअप इंटरस्टेलर टेक्नोलॉजीज इंकने एका निवेदनात म्हटले आहे की, रॉकेट इंजीनची, ज्याला झिरो म्हटले जाते, जपानमधील होक्काइडो स्पेसपोर्टमध्ये १० सेकंदांपर्यंत स्टॅटिक फायर टेस्ट करण्यात आली. कंपनीने म्हटले आहे की, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल म्हणजेच झिरो हे लिक्विड बायो मिथेनवर चालते. बायोमिथेन प्राण्यांच्या शेणापासून मिळते. हे कंपनीला होक्काइडो येथील डेअरी फार्ममधून मिळते.

आयएसटीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रॉकेट इंजीनच्या परीक्षणाचे फुटेजही शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये इंजून चालू झाल्याचे दिसत आहे आणि त्यातून आकाशी निळ्या रंगाची आग निघतानाही दिसत आहे. बायोमिथेन इंधनाने उड्डाण केलेल्या या रॉकेटने ताकी शहरामध्ये सुमारे दहा सेकंदांसाठी एका खुल्या हँगर दरवाजातून दहा ते पंधरा मीटरपर्यंत एक निळी-नारंगी ज्वाला फेकली. इंटरस्टेलर टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी ताकाहिरो इनागावा यांनी सांगितले की यामध्ये वापरलेला बायोमिथेन पूर्णपणे दोन स्थानिक डेअरी फार्ममधील गायींच्या शेणापासून बनवलेला होता.

हे आम्ही केवळ ते पर्यावरणासाठी चांगले आहे म्हणून केले असे नाही तर त्याची निर्मिती स्थानिक पातळीवरही करता येऊ शकते हे दर्शवण्यासाठी केले. ही प्रक्रिया अतिशय किफायतशीरही आहे आणि त्याचे परिणामही चांगले आहेत. गायीच्या शेणापासून बनवलेले हे इंधन शुद्ध आणि प्रभावी आहे. एखाद्या खासगी कंपनीने प्रथमच अशा प्रक्रियेतून इंधन मिळवले आहे. आता हे तंत्र संपूर्ण जगभरात वापरले जाऊ शकते.

भविष्यात अंतराळात सॅटेलाईट स्थापणार
गायीच्या शेणापासून रॉकेट उडवणा-या इंटरस्टेलर टेक्नॉलॉजीज आणि एअर वॉटर फर्मचे म्हणणे आहे की भविष्यात या इंधनाचा वापर करून अंतराळात सॅटेलाईटही स्थापित केले जाऊ शकतात. ही फर्म स्थानिक शेतर्क­यांच्या साथीने काम करते ज्यांच्याकडे आपल्या शेतात गायीच्या शेणापासून बायोगॅस तयार करण्याची उपकरणे आहेत.

कसे तयार होते एलबीएम इंधन?
कंपनी म्हटले आहे की, युरोपीय अतंराळ संस्थेने (ईएसए) अशा प्रकारचे रॉकेट इंजीन विकसित केल्यानंतर, एखाद्या खासगी कंपनीने पहिल्यांदाच अशा प्रकारचे एलबीएम इंधन तयार केले आहे. महत्वाचे म्हणजे, रॉकेट इंजीन सायन्सच्या विकासात हा एक मैलाचा दगड असल्याचे म्हणत, जगात असे पहिल्यांदाच घडले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच, एलबीएम इंधन हे बायोगॅसचा मुख्य घटक असलेल्या मिथेनला वेगळे आणि शुद्ध करून, तसेच जवळपास १६० अंश सेल्सिअसवर द्रवीकरण करून तयार केले जाते. असेही कंपनीने म्हटले आहे.