सुकेश आणि नोरा फतेहीच्या चॅटचा खुलासा, दोघांमध्ये 'या' लक्झरी कारबद्दल चर्चा झाली

सुकेश आणि नोरा फतेहीच्या चॅटचा खुलासा, दोघांमध्ये 'या' लक्झरी कारबद्दल चर्चा झाली
नवी दिल्ली - 

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहेत. हा खटला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत (EOW) सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरुद्ध कथित गुन्हेगारी कट, फसवणूक आणि सुमारे 200 कोटी रुपयांच्या खंडणीशी संबंधित आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. जॅकलिन आणि नोराला सुकेशकडून मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंशिवाय नोरा आणि सुकेशच्या गप्पाही समोर आल्या आहेत ज्यामध्ये दोघेही या गिफ्टबद्दल बोलत आहेत.

० नोरा आणि सुकेशचे चॅट आले समोर 
सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीला रेंज रोव्हर कारबद्दल विचारले- "तुला आवडते का?" यावर नोरा उत्तर देते, "हो, ही एक चांगली रफ यूज कार आहे. ती खूप सुंदर आहे, स्टेटमेंट कार आहे. यावर सुकेशने मेसेज केला - "मी तुम्हाला आणखी पर्याय दाखवतो."

० दुसर्‍या संभाषणात, सुकेश चंद्रशेखर नोरा फतेहीला लिहितो “तुम्ही एक मिनिट बोलू शकलात तर मला खूप आवडेल. मला आशा आहे की मी तुम्हाला ही भेट का दिली याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटत नसेल. मला हे दाखवून द्यायचे आहे की ते कोणत्याही हेतूने दिले गेले नव्हते, परंतु जेव्हा  तुम्ही एखाद्याला आवडता तेव्हा तुम्ही त्यांना भेटवस्तू देता, बस, दुसरे काही नाही."

० ईडीनेही नोराला अनेकदा समन्स बजावले आहेत. एवढेच नाही तर ईडीच्या आरोपपत्राने नोरा फतेहीचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले आहेत. आरोपपत्रानुसार, सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीला एक कोटी रुपये रोख, एक बीएमडब्ल्यू कार आणि एक आयफोन भेट दिला होता. एजन्सीने दावा केला आहे की चंद्रशेखरने फतेहीला बीएमडब्ल्यू कारव्यतिरिक्त 75 लाख रुपये दिले होते.

विशेष म्हणजे, दिल्लीतील तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत जॅकलीनचे जबाबही नोंदवले आहेत. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मालविंदर सिंग यांच्या पत्नीची २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंद्रशेखरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चौकशीनंतर अनेक नाव समोर आले.