पुढील दोन, तीन दिवस पुण्यासह राज्यातील अनेक शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुढील दोन, तीन दिवस पुण्यासह राज्यातील अनेक शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुणे , (प्रबोधन न्यूज )   -  पुण्यात मागील काही दिवसांत पाऊस पडला आहे. यामुळे पुणेकरांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पुण्यातील तापमानात चांगली वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस पुण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह राज्यातदेखील अनेक शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) हवामान अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, पुण्यातील उष्णतेच्या लाटेची स्थिती हळूहळू पावसात घट होईल. महाराष्ट्रात आता दोन दिवस पाऊस कमी होण्याची शक्यता आहे आणि तो प्रामुख्याने राज्याच्या दक्षिणेपर्यंत मर्यादित राहील. त्यामुळे पुण्यातील तापमानात वाढ आणि उष्णतेची लाट निर्माण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

बुधवारी पुण्यातील अनेक भागांनी 40 अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली, जी गेल्या काही दिवसांपासून शहरात नोंदवण्यात आलेल्या 36-38 अंशांवरून स्थिर वाढ झाली आहे. शिवाजीनगर येथे कमाल तापमान 40.6 अंश तर कोरेगाव पार्क येथे 42.3 अंश नोंदवले गेले. त्याचप्रमाणे राजगुरुनगर येथे 43.9, तळेगाव 43.8, पाषाण येथे 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसाच्या तापमानासोबतच रात्रीच्या तापमानातही लक्षणीय वाढ झाली असून, शिवाजीनगर येथे रात्रीचे तापमान तब्बल 27.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सरासरीपेक्षा हे तापमान 3 ते 4 अंशांनी जास्त असल्याचे सांगितले जात आहे.