गिरीश महाजन महाराष्ट् राज्याचे उपमुख्यमंत्री होणार?

नवी दिल्ली , (प्रबोधन न्यूज )   - लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील भाजपमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता असल्याचं दिसून येत असून देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम असल्याने गिरीश महाजन यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी पोहोचले असून त्यांच्याशी चर्चा सुरू झाल्याने लवकरच महाजन यांच्यवर महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.