सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय 

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय 
सिंधुदुर्ग -
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक 30 डिसेंबर रोजी पार पडली असून ही निवडणूक नारायण राणे अर्थात भाजपने जिंकत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. 
नारायण राणे आणि शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे लागले आहे.  जिल्हा बँकेसाठी 98.67 टक्के मतदान झाले होते. तर महाविकास आघाडीचे सहकार समुद्धी पॅनल तर भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक समुद्धी पॅनल रिंगणात होते.

जिल्हा बँकेसाठी 98 .67 टक्के मतदान झाले होते. 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. मतमोजणी माध्यमिक शिक्षक पतपेढीत पार पडली. या निवडणुकीत 981 पैकी 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी तीन राऊंडमध्ये आठ टेबलांवरती एकाच वेळी करण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात महिला उमेदवारांची मतमोजणी केली गेली. 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक 2008 ते 2019 पर्यंत म्हणजे तब्बल 11 वर्ष राणेंच्या ताब्यात होती. मात्र 2019 साली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेली. तब्बल अकरा वर्षांपासून राणे यांच्या हाती सत्ता असलेली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेल्यामुळे राणे यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवलेली होती. याचे फळ अखेर राणे यांना मिळाले आहे. आता या बँकेवर भाजपची सत्ता असेल.

निकाल याप्रमाणे :
भाजपचे प्रकाश बोडस विजयी
भाजपचे दिलीप रावराणे विजयी
भाजपचे मनीष दळवी विजयी
भाजपचे महेश सारंग विजयी
भाजपचे अतुल काळसेकर विजयी
भाजपचे विठ्ठल देसाई विजयी
भाजपचे बाबा परब विजयी
भाजपचे समीर सावंत विजयी
भाजपचे गजानन गावडे विजयी
महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी
महाविकास आघाडीचे गणपत देसाई विजयी
महाविकास आघाडीचे विद्याप्रसाद बांदेकर विजयी