उदयनराजेंचा जिल्हा बँक निवडणुकीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा

उदयनराजेंचा जिल्हा बँक निवडणुकीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा


सातारा - सातारा जिल्हा बँकेच्या पॅनेलमध्ये मला घेणारे ते कोण मी ठरवतो कुठे जायचे ते माझी जिरवण्यासाठी फील्डिंग लावणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे मला विरोध करा पण सभासदांची जिरवू नका, असे टोमणे मारत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी पॅनलवर निशाणा साधला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “असं का? लै मस्ती आलीये? बघू. तुम्ही इकडचे, तिकडचे बोलवून घ्या लोकांना…आपण टाईट करु, जिरवू. माझी नका जिरवू, मेहेरबानी करा, माझी विनंती आहे. मी तुमचा कोणाचा दुश्मन नाही, हात जोडून विनंती करतो. बँक शेतकरी सभासदांची आहे, मी त्या गोरगरीब शेतकऱी बांधवांच्या वतीने विनंती करतो, त्यांची जिरवू नका. हात जोडून विनंती करतो, माझी जिरवायची तर जिरवा”.