जॅकलिनचा सुकेशसोबतचा ‘तो’ प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल !

जॅकलिनचा सुकेशसोबतचा ‘तो’ प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल !

मुंबई -

दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये अटकेत असलेला २०० कोटींचा घोटाळा केलेल्या सुकेश चंद्रशेखरसोबत असलेल्या कथित संबंधामुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या चर्चेत आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून अनेकदा जॅकलिनची चौकशी करण्यात येत आहे. सुकेशने जॅकलिनला करोडो रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे तपासात समोर आले आहे. २३ ऑक्टोबर रोजी सुकेश चंद्रशेखरचे वकील यांनी खुलासा केला होता की जॅकलीन तुरुंगात असलेल्या सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर जॅकलिनचा आणि सुकेशचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्या पाठोपाठ आता जॅकलिनच्या मानेवर लव्ह बाईट असणारा सुकेशसोबता फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये सुकेश आणि जॅकलिन एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. तसेच जॅकलिनच्या मानेवर लव्ह बाईट असल्याचे दिसत आहे. त्यांचा हा इंटिमेट फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला गुची जिम वेअर, गुची शूज, रोलॅक्स घड्याळ, १५ जोड कानातले, ५ बिर्किन बॅग, हर्म्स बांगड्या आणि एली बॅग यांसारखे महागडे गिफ्ट्स दिले होते. याशिवाय सुकेशने जॅकलिनला मिनी कूपर कारही भेट म्हणून दिली. विशेष म्हणजे सुकेशने जॅकलिनच्या आईला १ लाख ८० हजार डॉलरची पोर्श कारही भेट म्हणून दिली होती.

काही दिवसांपूर्वी जॅकलिनने सुकेश चंद्रशेखरला ती कशी भेटली याबाबतचा खुलासा केला होता. ती सुकेश चंद्रशेखरला कशी भेटली याबाबतही तिने उघडपणे सांगितले आहे. जॅकलिनने सुकेशला फेब्रुवारी २०१७ पासून ओळखत असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये अटक झाल्यानंतर ती कधीही त्याला भेटली नाही, असेही तिने म्हटले होते.