लठ्ठ नववधूंनी लग्नात लेहेंगा खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा !

लठ्ठ नववधूंनी लग्नात लेहेंगा खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा !
मुंबई - 

लग्नसोहळा प्रत्येक मुलींसाठी खास असतो.या दिवशी प्रत्येकीलाच सुंदर दिसण्याची इच्छा असते. परंतु लठ्ठ किंवा प्लस साईजच्या मुलींना लग्नसोहळ्यासाठी ड्रेस किंवा लेहेंगा खरेदी करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांची जाडी लपविणारा तसेच त्यांचे सौंदर्य खुलविणारा लेहेंगा अशा मुली शोधत असतात. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही स्वत:साठी परफेक्ट लेहेंगा खरेदी करू शकता. लेहेंगा खरेदी करताना प्लस साईज ब्राइड्सनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया. 

० प्लस साइजच्या मुलींनी लग्नासाठी मरून, नेव्ही ब्लू, बॉटल ग्रीन, पर्पल, वाईन असे डीप कलर निवडावे.  हे रंग तुम्हाला स्लिम दिसण्यास मदत करतील.

० प्लस साईज मुलींनी शिफॉन, जॉर्जेट किंवा नेट फॅब्रिकचा लेहेंगा निवडावे. कडक म्हणजे पफ्ड फॅब्रिकमुळे तुम्ही लठ्ठ दिसता, त्यामुळे अशा प्रकारचा लेहेंगा खरेदी करू नका.

० कळीदार, ए-लाइन किंवा फिश कट लेहेंगा प्लस साइज मुलींवर चांगले दिसतात. तसेच, लेहेंग्याला पातळ बॉर्डर असावी हे लक्षात ठेवा. रुंद बॉर्डर असलेल्या लेहेंग्यात तुम्ही जाड दिसाल.

० आधुनिक दिसण्यासाठी खूप लो कट किंवा ओपन चोली खरेदी करू नका. पारंपारिक चोली प्लस साईजच्या मुलींवर चांगली दिसते. लेहेंगा-चोली मध्ये जास्त अंतर नसावे आणि ब्लाउजची मागची बाजू जास्त उघडी नसावी हेही लक्षात ठेवा. ब्लाउजचा गळा 8 इंचापेक्षा जास्त खाली ठेवू नये.

० चोळीचा गळा चौकोनी, डीप व्ही, हाय नेक असाच ठेवा. स्लीव्हलेस, ऑफ किंवा वन शोल्डर, हॉल्टर नेक इत्यादी स्लीव्हलेस चोळी घालणे टाळा. यामध्ये तुम्ही आणखी जाड दिसाल. त्याऐवजी मेगा स्लीव्हज किंवा इन-कट हॉल्टर स्लीव्हज वापरा.
 
० लेहेंग्यात मणी, सिक्वीन्स, अँटीक गोल्ड किंवा प्रिंटेड लहान आकृतिबंधांचे भरतकाम अथवा एम्ब्रॉयडरी असावी, याची खात्री करा. या प्रकारचे वर्क तुम्हाला खूप शोभेल.

० केवळ लेहेंगा चोलीच नाही तर दुपट्टा देखील तुम्हाला परफेक्ट दिसण्यास मदत करेल. दुपट्टा फुगलेला नसावा याची काळजी घ्या. तुम्ही शिफॉन किंवा नेट दुपट्टा निवडू शकता.