नरेंद्र मोदी घेणार ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नरेंद्र मोदी घेणार ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली , (प्रबोधन न्यूज )  - नरेंद्र मोदी तिस-यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. रविवार, ९ जून रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीची तारीखही निश्चित झाली असून ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळ स्थापनेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठर पार पडली. एनडीएच्या खासदार, मुख्यमंर्त्यांसह युतीचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडण्याची अपेक्षा आहे, मित्रपक्ष आणि खासदारांनी त्यास अनुमोदन देण्याची शक्यता आहे.२०२४ च्या लोकसभा निकालांनुसार, एनडीए आघाडी २९४ जागांवर विजय मिळाला असून, त्यापैकी एकट्या भाजप २४० जागांवर विजय मिळवला आहे. तर इंडिया आघाडीला २३२ जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये एकट्या काँग्रेसने १०० जागांवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहे. २०१९ च्या तुलनेत येथे भाजपच्या जागांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. या राज्यांमध्ये इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेले पक्ष आघाडीवर आहेत.