मुंबईकरांना मिळणार एक दिवसाच्या लोकल प्रवासाचे तिकीट

मुंबईकरांना मिळणार एक दिवसाच्या लोकल प्रवासाचे तिकीट

मुंबई-

मुंबईकरांना एक दिवसाचा प्रवास करण्यासाठी लोकलंच तिकीट मिळणार आहे. मुंबईकरांसाठी हा सर्वांत मोठा दिलासा मानला जातो आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी बंधनासहित लोकल सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र आता या बंधनामध्ये सूट देत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता पूर्वीप्रमाणेच एक दिवसाच्या प्रवासासाठी तिकीट मिळणार आहे. उद्या सोमवारपासून हा निर्णय लागू होणार आहे.

राज्य सरकारने लोकलची तिकीट्स विक्री बंद करून सर्वांना फक्त मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते, मात्र त्यामुळे गेले काही दिवस प्रचंड गोंधळ आणि संताप बघायला मिळाला, रेल्वेने ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्या नंतर राज्य सरकारने पुन्हा एक पत्र रेल्वेला लिहिले. या पत्रात लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अश्या सर्वच प्रवाश्यांना एक दिवसीय तिकीट देण्यात यावे अशी विनंती केली आहे. त्यासाठी रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी, कोविड नियम पाळले जात आहेत याची खात्री करावी अश्या सूचना देखील राज्य सरकारने केल्याचे पत्रात आहे.