गृहमंत्री अमित शहांनी सरदार पटेलांना वाहिली आदरांजली

केवडिया -
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती असून, आज 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गुजरात दौऱ्यावर असून, ते केवडिया या ठिकाणी पोहोचले आहे. त्यांनी आज सरदार पटेल यांचा सर्वांत उंच पुतळा असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' येथे जाऊन पटेलांना वंदन केले.
अमित शहा यांच्यासोबत भारतीय हॉकी टीमचे कर्णधार मनप्रीत सिंह यांच्यासह तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी तसेच ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेले अनेक खेळाडून देखील या ठिकाणी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इटलीमधील जी-20 शिखर संमेलनामध्ये असल्याने ते व्हिडीओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून सरदार पटेलांना वंदन करणार आहे.