परमबीर सिंग बेल्जियममध्ये : संजय निरुपम यांचा दावा

मुंबई -
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे सध्या बेल्जियममध्ये आहेत. असा दावा काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे. यासोबतच निरुपम यांनी परमबीर सिंग यांना पळून जाण्यास कोणी मदत केली? असा सवालही निरुपम यांनी केला आहे.
परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरोधात देखील आरोप झाले. त्यावरून ठाणे कोर्टाने देखील परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जाहीर केले होते.
संजय निरुपम यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, हे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आहेत. मंत्र्यावर खंडणी वसूलीचा आरोप होता. तो स्वत: पाच गुन्ह्यांमध्ये वॉण्टेड आहे. ते फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आता ते बेल्जियममध्ये आहेत असे समजते. ते बेल्जियमला गेले कसे? त्याला सेफ पॅसेज कोणी दिला? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना आणू शकत नाहीत का? यासह त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.