भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी दिवाळीनंतर फटाके फोडणार

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी दिवाळीनंतर फटाके फोडणार

मुंबई -

उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करणार, असं म्हटलं होतं. पण, जिथं पाहावे तिथं घोटाळे दिसतात. त्यांना महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करणं जमलं नाही. पण, आता मी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार असून दिवाळीनंतर आपण फटाके फोडणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले.

भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना ते बोलत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचं नाव घेत महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण करण्याचं पाप ठाकरे-पवार सरकारने केलं आहे. दिवाळीमध्ये फटाके फोडले जातात. पण, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. दिवाळी जाऊ द्या फक्त घोटाळे बाहेर काढणार. तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे बाहेर काढणार. ठाकरे सरकारमध्ये जावयांना खुश केले जाते. अजित पवारांनी त्यांच्या जावयांना खुश केलं. हसन मुश्रिफांनी त्यांच्या आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयांना खुश केले जात असल्याचेही' सोमय्या म्हणाले.

गेले १३ दिवस नवाब मलिक काय बोलत आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचं नाव घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले. मुख्यमंत्रिपदासाठी विश्वासघात केला म्हटलं. पण, आता ते महाराष्ट्राची संस्कृती आणि जनतेचा अपमान करत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घोटाळ्यापासून लक्ष विचलीत करायचं होतं. नवाब मलिक रोज नवे काहीतरी वेगळे आरोप करतात. समीर वानखेडेंवर मुस्लीम असल्यावरून टीका केली जाते. १३ दिवस काय चाललंय हे?'' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.