लसणाचे 'इतके' फायदे ऐकून आजपासून दररोज खाल !

लसणाचे 'इतके' फायदे ऐकून आजपासून दररोज खाल !
मुंबई - 
तसे पाहता आपल्या रोजच्या स्वयंपाकात आपण लसूण वापरतच असतो. गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे की खारट रस नैसर्गिकरित्या असणारा एकमेव कंद आहे. संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा. अशा या लसणाचे आपल्याला अगणित फायदे होतात. कोणते ते पाहूया. 
 
लसणाचे उपयोग :
१. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात.
 २. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .
 ३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.
 ४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .
 ५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .
 ६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे. हेच तेल छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो.
 ७. भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे.
 ८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा.
 ९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो.
 १०. लसूण घालून उकळलेले दुध दिल्यास जुनाट खोकला, दमा, क्षयरोग यांचा नाश होतो.
 ११. लसूण मनाची मरगळ घालवतो.
 १२. हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .
 १३. लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते. कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते. कुजणाऱ्या/ सडणाऱ्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .
 १४. तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो.
'या' लोकांनी लसूण खाऊ नये : 
 * लसूण तीक्ष्ण , उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती, गर्भवती स्त्रिया यांना तो वर्ज्य आहे.
 * जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजावे.