'हे' आहे जगातील सर्वात रहस्यमय बेट, जिथे दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना जिवंत जाळले होते, जाणून घ्या कारण

'हे' आहे जगातील सर्वात रहस्यमय बेट, जिथे दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना जिवंत जाळले होते, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली - 

जगात अशी अनेक रहस्ये आहेत ज्यांचा शोध आजपर्यंत वैज्ञानिक घेऊ शकलेले नाहीत. यामध्ये अनेक रहस्यमय बेटांचा समावेश आहे, ज्याबद्दल जाणून घेतल्यास तुमचा थरकाप उडेल. असेच एक बेट इटलीमध्ये आहे, जिथे गेलेला माणूस परतला नाही. जाणून घेऊया रहस्यांनी भरलेल्या या बेटाबद्दल. 


पोवेग्लिया नावाच्या या बेटावर अनेकदा गूढ घटना घडतात, त्यामुळे जगभरात त्याची चर्चा होते. हे रहस्यमय बेट व्हेनिसच्या खाडीत इटालियन शहर व्हेनिस आणि लिडो यांच्यामध्ये आहे. असे म्हटले जाते की या बेटाचे रहस्य सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे जो गेला तो जिवंत परत आला नाही. त्यामुळे या रहस्यमय बेटावर कोणालाही भेट देण्यास इटालियन सरकारने बंदी घातली आहे.

असे म्हटले जाते की शेकडो वर्षांपूर्वी इटलीमध्ये प्लेगची साथ पसरली होती ज्याने भयानक रूप धारण केले होते. त्यावेळी या साथीवर कोणताही इलाज नव्हता, त्यामुळे येथील सरकार चिंतेत होते. या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकार चिंतेत होते. या भीतीपोटी सरकारने या बेटावरील सुमारे 1 लाख 60 हजार लोकांना जिवंत जाळले होते. यानंतर येथे 'ब्लॅक हीट' म्हणजेच काळा ताप नावाचा आजारही पसरू लागला.

यानंतर सरकारने निर्णय घेतला की या लोकांचे मृतदेह देखील याच बेटावर पुरण्यात यावे. तेव्हापासून स्थानिक लोक या बेटाला शापित मानतात. असे म्हणतात की, ज्यांना जाळण्यात आले त्यांचे आत्मे आजही येथे भटकतात. अनेक लोकांनी दावा केला आहे की त्यांनी येथे आत्मे पाहिले आहेत. या बेटावरून विचित्र आवाजही ऐकू येत असल्याचा दावा केला जातो.

या बेटावर घडणाऱ्या रहस्यमय घटनांमुळे इटालियन सरकारने लोकांना येथे येण्यास बंदी घातली आहे. हे बेट जगातील सर्वात भयानक ठिकाणांपैकी एक आहे.