'या' जीवघेण्या झाडांच्या संपर्कात आलात तर मृत्यू निश्चित !

'या' जीवघेण्या झाडांच्या संपर्कात आलात तर मृत्यू निश्चित !
नवी दिल्ली -  
 
साधारणपणे झाडे आणि वनस्पतींचा विचार करताच एक प्रसन्नता येते. विविध प्रकारची फळे आणि फुले यांनी लगडलेल्या झाडांना पाहूनच चित्तवृत्ती बहरून येतात. शीतल छाया, रुचकर फळे आणि मनमोहक फुले देणारी झाडे माणसांना मृत्यूही देऊ शकतात, यावर विश्वास बसणे कठीण असले तरी ते सत्य आहे. जगात काही झाडे आणि वेली माणसांसाठी इतकी धोकादायक आहेत की त्यांना स्पर्श करून किंवा त्यांची फळे वा फुले खाल्ल्याने माणसाचा मृत्यू होऊ शकतो किंवा मनुष्य गंभीर आजाराने ग्रस्त होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला त्या निवडक झाडांविषयी सांगणार आहोत, ज्यांचा संपर्क मानवांसाठी धोकादायक आहे.
१. मॅचीनेल ट्री 
मध्य दक्षिण अमेरिकेत आढळणारे हे झाड इतके धोकादायक आहे की त्याचे फळ खाणे आणि त्याच्या जवळ जाणे हे मानवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. या कारणास्तव या झाडाला डेथ ऍपल म्हणतात.
2. रोझरी पी 
हे सुंदर दिसणारे झाड वास्तवात खूप धोकादायक आहे. त्याच्या सुंदर लाल बिया इतक्या धोकादायक आहेत की जर चुकून कुणी त्या खाल्ल्या तरी एखादी व्यक्ती मृत्यूच्या खाईत जाईल. गंमत म्हणजे या बियांचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जात असे.  परंतु ते इतके धोकादायक असल्याचे सिद्ध झाल्यामुळे आता या बियांपासून लांबच राहिले जाते. 
3. जायंट हॉगवीड
ब्रिटनमध्ये सापडलेल्या या वनस्पतीची पांढरी फुले दिसायला खूप सुंदर असतात. पण ही फुले खाल्ल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जर ही फुले डोळ्यांच्या संपर्कात आली तर लोक आंधळेही होतात.
4.पॉइजन ओक अँड आयव्ही 
नावातच विष असणाऱ्या या झाडाच्या संपर्कामुळे माणसांच्या त्वचेवर फोड किंवा लाल पुरळ येतात. कित्येक प्रकरणांमध्ये, अनेकांचा यामुळे मृत्यू झाला असल्याचीही उदाहरणे आहेत. ही वनस्पती मानवी त्वचेसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे.
5. सरबेरा ओडोलम 
या वनस्पतीला 'सुसाईड ट्री' असेही म्हणतात. लोक या वनस्पतीचा वापर फक्त लोकांना मारण्यासाठी करतात. म्हणजेच, हे विष मारण्यासाठी देखील प्रभावी सिद्ध झाले आहे. कारण हे विष कोणत्याही वैज्ञानिक तपासाखाली निष्पन्न होत नाही.