मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक

मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक

 पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -    मेट्रोच्या साईटवरून कामाचे साहित्य चोरून नेत असलेल्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना रविवारी (दि. 27) मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास मधुबन हॉटेल समोर, मेट्रो ब्रिजखाली हिंजवडी येथे घडली. 

बंटी सुरेश नवगिरे (वय 23, रा. रहाटणी), स्वयम विकास कांबळे (वय 18, रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सिद्धेश्वर विकास मस्के (वय 26, रा. थेरगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथे शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. हिंजवडी मधील मधुबन हॉटेल समोर मेट्रोच्या कामासाठी साहित्य ठेवले आहे. त्यातील 1800 रुपये किमतीची एक लोखंडी जाळी आणि नऊ हजार रुपये किमतीची एक केबल आरोपी रिक्षातून चोरून नेत होते. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.