एलपीजी गॅस पाईपलाईनला छिद्र पाडून गॅस चोरीचा प्रयत्न

एलपीजी गॅस पाईपलाईनला छिद्र पाडून गॅस चोरीचा प्रयत्न

  पिंपरी (प्रबोधन न्यूज )  -   उरण ते चाकण शिक्रापूर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीपर्यंत येणाऱ्या गॅस पाईपलाईनला छिद्र पडून गॅस चोरी करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार शनिवारी (दि. 26) सकाळी आठ ते सायंकाळी साडेचार वाजताच्या कालावधीत खेड तालुक्यातील शिंदे गावाजवळ फोटान कंपनीजवळ घडला.

शिवशंकर व्यंकटराव मस्की (वय 43, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीची उरण येथून चाकण शिक्रापूर येथील कंपनी पर्यंत एलपीजी गॅस पाईपलाईन आली आहे. शिंदे गावातील फोटान कंपनीजवळ अज्ञातांनी शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी साडेचार वाजताच्या कालावधीत पाईपलाईनला टॅपिंग करून त्याच्या पुढील बाजूला वॉल्व्ह बसवून गॅस चोरी करण्याचा प्रयत्न केला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.