मालवाहतूक ट्रकला दुचाकीची धडक; दुचाकीवरील दोघे जखमी

मालवाहतूक ट्रकला दुचाकीची धडक; दुचाकीवरील दोघे जखमी

     पिंपरी ,  (प्रबोधन न्यूज )  -    मालवाहतूक ट्रकचा ब्रेक फेल होऊन सिस्टीम लॉक झाल्याने ट्रक थांबला असता दुचाकीने पाठीमागून ट्रकला धडक दिली. त्यात दुचाकीवरील तरुण आणि तरुणी जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 25) रात्री दहा वाजता देहूरोड जुना जकात नाका येथे घडली. 

खाजासाहेब गौतम गायकवाड (वय 35, रा. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हारून रशीद चौधरी (वय 22, रा. चिखली) आणि एक तरुणी अशी जखमींची नावे आहेत. हारून याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील मालवाहू ट्रक निगडीकडून देहूरोडच्या दिशेने घेऊन जात होते. जुना नाकात नाका येथे आल्यानंतर त्यांच्या ट्रकचा ब्रेक फेल होऊन सिस्टीम लॉक झाली. त्यामुळे ट्रक जागेवर थांबला. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकीने ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यात हारून आणि त्याच्या दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जखमी झाले आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.