पादचाऱ्यास धडक देऊन दुचाकी पळाला

पादचाऱ्यास धडक देऊन दुचाकी पळाला
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पायी चालत जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला एका दुचाकीने धडक दिली. धडक देऊन दुचाकीस्वार पळून गेला. ही घटना रविवारी (दि. 2) सकाळी सव्वा अकरा वाजता लिंक रोड पिंपरी येथे घडली.
नाथा चांगुजी निकाळजे (वय 64, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी चालत त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी एका मोपेड दुचाकीवरून आलेल्या एकाने फिर्यादी यांना धडक दिली. त्यात फिर्यादी जखमी झाले. धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार पळून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत