सुष्मिता सेन ललित मोदींशी लग्न करणार, त्यासाठी रोहमनला दिला डच्चू

सुष्मिता सेन ललित मोदींशी लग्न करणार, त्यासाठी रोहमनला दिला डच्चू
सुष्मिता सेन ललित मोदींशी लग्न करणार, त्यासाठी रोहमनला दिला डच्चू
सुष्मिता सेन ललित मोदींशी लग्न करणार, त्यासाठी रोहमनला दिला डच्चू
सुष्मिता सेन ललित मोदींशी लग्न करणार, त्यासाठी रोहमनला दिला डच्चू

मुंबई, (प्रबोधन न्यूज) – प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन ही व्यावसायिक ललित मोदींशी लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या आधी सुष्मिताचे रोहमनशी संबंध होते. परंतु आता ललित मोदींशी तिचे सूत जुळले असून, तिने रोहमनला डच्चू दिल्याचे सांगितले जात आहे. ललित मोदी यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले आहे व ते एकाकी जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांनी व सुष्मिताने एकत्र येण्याचा विचार केला आहे.

दरम्यान, गुरूवारी रात्री उशिरा तिचं आणि ललित मोदी यांचं लग्न झाल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर ललित मोदी यांनी स्पष्टीकरण देत आम्ही लग्न केलेलं नाही तर एकमेकांना डेट करत आहोत असं म्हटलं आहे. अशात आता ललित मोदी आणि सुश्मिता सेन या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला असावा अशाही बातम्या समोर येत आहेत. सुश्मिता आणि ललित मोदी यांचा एक फोटो समोर आला आहे यामध्ये सुश्मिता हातातली रिंग दाखवते आहे. ही रिंग म्हणजे त्यांच्या साखरपुड्याचीच आहे अशी चर्चा आता रंगली आहे.

IPL चे माजी चेअरमन ललित मोदी यांचं सोशल मीडिया अकाऊंट सुश्मितासोबतच्या फोटोंनी खचाखच भरलं आहे. अशात ललित मोदी यांनी त्यांच्या ट्विटर एक डीपी ठेवला आहे. ज्यामध्येही सुश्मिता त्यांच्यासोबत आहे. सगळीकडे गुरूवारपासून ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांची चर्चा होते आहे. फोटो समोर आल्यानंतर अनेकांना हे वाटलं होतं की या दोघांनी लग्न केलं. मात्र तसं झालेलं नाही हे ललित मोदी यांनीच स्पष्ट केलं.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मात्र सुष्मिता तिच्या खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. कधी रिलेशनशिप तर कधी ब्रेकअप यामुळे अभिनेत्री प्रसिद्धीझोतात असते.

सुष्मिता सेनने चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून अफाट कमाई केली आहे. वयाच्या 18 व्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी सुष्मिता कोट्यावधींची मालकीण आहे. ही  अभिनेत्री आपल्या एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी इतकं मानधन घेते. जाहिरातींच्या माध्यमातून तब्बल 1.5 कोटींपर्यंत कमाई करते. 46 वर्षांच्या सुष्मिता सेनने चित्रपट, वेबसीरिज आणि जाहिरातींमधून गडगंज पैसे मिळवला आहे. एका वेबसाईटच्या मते या अभिनेत्रीची एकूण संपत्ती 74 कोटींची आहे.

ललित मोदीआधी सुष्मिता सेननं अनेक जणांना डेट केलंय; मात्र एकाबरोबरही लग्न केलं नाही. कोण कोण आहेत ते पाहूयात.

विक्रम भट्ट : मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुश्मिताचे नाव सर्वप्रथम चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांच्याशी जोडले गेले. दस्तक (1996) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुश्मिता आणि विक्रम जवळ आले होते. काही काळ रिलेशनशिपनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

रणदीप हुड्डा : रणदीप हुड्डा सुश्मितासोबतच्या अफेअरमुळेही एकेकाळी चर्चेत होता. कर्मा, कन्फेशन आणि होली या चित्रपटात एकत्र काम करताना दोघे जवळ आले.

वसीम अक्रम : 2013 मध्ये सुश्मिताचे माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमसोबत अफेअर असल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या. दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात होते, मात्र सुश्मिताने हे वृत्त फेटाळून लावले होते.

हृतिक भसीन: 2015 च्या आसपास, सुश्मिता मुंबईतील रेस्टॉरंट मालक हृतिक भसीनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते.

मुदस्सर अझीझ: दिग्दर्शक मुदस्सर अझीझ हे देखील अशा लोकांपैकी एक होते ज्यांचे सुश्मिताशी अफेअर होते. सुष्मिताने दिग्दर्शक म्हणून मुदस्सरचा पहिला चित्रपट ‘दुल्हा मिल गया’मध्येही काम केले होते, जो फ्लॉप ठरला होता..

आता ललित मोदींबद्दल जाणून घेऊयात.

ललित मोदी उद्योगपती कृष्ण कुमार मोदी यांचे सुपुत्र आहेत. ललित यांचे आजोबा गुजरमल मोदी यांनी मोदी ग्रुपची स्थापना केली. मोदीनगर शहर वसवले. पैशांची कोणतीही कमी नव्हती. पण मुलाने पैशांची इज्जत करावी, अशी कृष्ण कुमारांची इच्छा होती. त्यांनी ललित मोदींना शिमल्याच्या बोर्डिंग स्कुलमध्ये टाकले. पण ललित यांनी अमेरिकेत शिकण्याचा हट्ट धरला. वडिल बालहट्टापुढे झुकले. अमेरिकेत पोहोचल्यानंतर ललितच्या डिमांड्स आणखी वाढल्या. त्यांनी वडिलांकडे कार मागितली. वडिलांनी 5 हजार डॉलर्स दिले. तसेच एखादी स्वस्त कार खरेदी करण्याचा सल्ला दिला.

ललित मोदींनी स्वस्त कार खरेदी केली नाही. त्यांनी मर्सिडीज कार हप्त्यांवर खरेदी केली व 5 हजार डॉलर्सचा पहिला हप्ता भरला. ते हप्त्यांवर कार खरेदी करणारे कुटुंबातील पहिले सदस्य बनले. त्यानंतर त्यांना अमेरिकेत 400 ग्रॅम कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक झाली. त्यांच्यावर ड्रग पॅडलिंग, किडनॅपिंग व हल्ला करण्याचेही आरोप झाले. त्यावेळी ललित कौटूम्बिक प्रभावामुळे त्यातून बाहेर पडल्याची चर्चा होती.

अमेरिकेतून परतल्यानंतर मोदींची मैत्री त्यांच्या आईच्या मैत्रीण मीन सगराणी यांच्याशी झाली. मीनल ललितहून 10 वर्षे मोठ्या होत्या. त्या नायजेरियात राहणाऱ्या एका सिंधी उद्योगपतीच्या एक्स वाइफ होत्या. मोदींनी मीनलपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. कुटुंबाने तीव्र विरोध केला. त्यानंतरही त्यांनी लग्न केले. लग्नानंतर कुटुंबाने त्यांना प्रदिर्घकाळापर्यंत व्यवसायापासून दूर ठेवले. मुंबईत राहण्यासाठी वडिलांकडून त्यांना एक फिक्स अलाउंस मिळत होता.

त्यानंतर ललित बिझनेसमध्ये परतले. 1992 मध्ये ते अमेरिकन सिगारेट कंपनी गॉडफ्रे फिलिप्सच्या भारतीय व्यवसायाचे कार्यकारी संचालक बनले. तेव्हा गोडफ्रे फिलिप्स भारतातील दुसरी सर्वात मोठी सिगारेट कंपनी होती. पुढे जाऊन मोदींनी पत्नी मीनल यांच्या वडिलांचे घर खरेदी केले व त्यांना भेट म्हणून दिले. ही कहाणी इन्सपायरिंग वाटू शकते. पण 2019 मध्ये या घराला आग लागली होती, हे ही लक्षात घ्या. आरोप आहे की विम्याची रकम मिळवण्यासाठी हे घर पेटवून देण्यात आले.

ललित मोदींनी 1993 साली मोदी एंटरटेनमेंट नेटवर्कची सुरूवात केली. या कंपनीने वॉल्ट डिज्नी पिक्चर्स व फॅशन टीव्हीसोबत 10 वर्षांचा करार केला. कंपनी त्यांचे चॅनल्स भारतात डिस्ट्रीब्यूट करत होती. यावेळी त्यांना वॉल्ट डिज्नीच्या ESPN हे चॅनल डिस्ट्रीब्यूट करण्याचीही संधी मिळाली.

ESPN वर भरातीय क्रिकेट संघाच्या अनेक सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जात होते. मोदींनी येथेच क्रिकेटची ताकद ओळखली. क्रिकेटची बाजारपेठ त्यावेळी ते चालवणाऱ्या लोकांच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त असल्याची जाणिव त्यांना लवकरच झाली. क्रिकेटच्या माध्यमातून अब्जावधींची कमाई करता येते, असे त्यांना वाटत होते.

IPL ची संकल्पना सुचली - या आयडियावर काम करण्यासाठी मोदींनी स्वतः क्रिकेटच्या प्रशासनात येण्याचा निर्णय घेतला. प्रथम ते हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेत आले. येथे डाळ शिजत नसल्याचे पाहून त्यांनी राजस्थान क्रिकेट संघटनेत जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी नागौर येथून जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. प्रथम ते हिमाचलशी संबंधित होते आणि नियमांनुसार त्यांना दुसऱ्या राज्यातून ही निवडणूक लढवता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी आपले नाव ललित कुमार मोदीच्या जागी केवळ ललित कुमार लिहिले. ते निवडणूक जिंकले.

त्यानंतर ते राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही झाले. त्यावेळी राजस्थानात वसुंधरा राजे यांचे सरकार होते. निवडणुकीपूर्वी राजस्थानात एक नवा नियम अस्तित्वात आला. त्यामुळे मतदान करणारे 66 जिल्हा क्रिकेट अधिकारी अपात्र ठरले. केवळ 32 मत पडले. मोदी जिंकले व थेट अध्यक्ष झाले.

त्यानंतर ललित मोदी IPL ची संकल्पना घेऊन जगमोहन दालमिया यांच्याकडे केले. पण दालमियांनी त्यांना फार महत्व दिले नाही. त्यानंतर ते दालमियाचे प्रतिस्पर्धी शरद पवार यांच्याकडे गेले. पवारांना त्यांची संकल्पना पसंत पडली. त्यानंतर दालमियांना हरवून पवार बीसीसीआयचे अध्यक्ष झाले. त्यानंतर ललित यांना आयपीएल सुरू करण्याची परवानगी मिळाली.