क्षणार्धात एखाद्याचा जीव घेणारे 'हे' आहेत जगातील सर्वात धोकादायक कोळी किडे !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

क्षणार्धात एखाद्याचा जीव घेणारे 'हे' आहेत जगातील सर्वात धोकादायक कोळी किडे !


पुणे - साधारणपणे भिंतींवर आढळणाऱ्या कोळी किड्याला सहसा कुणी घाबरत नाही. मात्र, याच कोळी किड्यांच्या अशाही प्रजाती आढळतात, जे क्षणार्धात माणसांचा जीव घेऊ शकतात. चला तर, आज आपण जगातील पाच अत्यंत धोकादायक कोळी किड्यांबद्दल बोलणार आहोत, जे चावल्यानंतर व्यक्तीचा क्षणात मृत्यू होऊ शकतो.  

1. ब्राझिलियन वॉन्डरिंग स्पायडर 
 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार ब्राझीलचा वॉन्डरिंग स्पायडर कोळी हा जगातील सर्वात धोकादायक कोळी किडा आहे. त्याचे न्यूरोटॉक्सिन विष इतके प्राणघातक आहे की तो चावल्यानंतर एखादी व्यक्ती क्षणात मरू शकते. हा कोळी चावल्यानंतर, व्यक्ती त्याच्या स्नायूंवरील नियंत्रण गमावते आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. या कोळी किड्याच्या चाव्यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

2. सिडनी फनेल वेब
 हा जगातील दुसरा सर्वात धोकादायक कोळी किडा आहे.  त्याचे शास्त्रीय नाव अट्रॅक्स स्टोक्सस आहे.  शिकार करण्यात हा कोळी अतिशय धोकादायक आहे.  त्याचे नाव जगातील सर्वात घातक कोळी किड्यांमध्ये गणले जाते.  त्याचा आकार फनेल सारखा आहे.  या कारणास्तव त्याला सिडनी फनेल म्हणतात.  त्यांना ओलसर भागात राहायला आवडते.

3. ब्राऊन रिक्लूज स्पायडर 
ब्राऊन रिक्लूज स्पायडरची गणना जगातील सर्वात विषारी कोळी किड्यांमध्ये केली जाते.  याला व्हायोलिन किंवा फिडल बॅक स्पायडर असेही म्हणतात.  हे कोळी मुख्यतः अमेरिकेच्या मध्य-पश्चिम आणि आग्नेय भागात आढळतात.

4. रेडबॅक / ब्लॅक विडो स्पायडर
रेडबॅक स्पायडर ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात.  या कोळ्यांच्या पाठीवर लाल रंगाची रेष असते. ज्यामुळे ते सहज ओळखता येतात. शिकार करण्याच्या बाबतीत हे कोळी किडे अत्यंत प्राणघातक आहेत.  त्यांनी चावल्याची अनेक प्रकरणे वारंवार समोर येत असतात.

5. सिक्स आय सॅण्ड स्पायडर 
जगातील धोकादायक कोळी किड्यांच्या यादीत सिक्स आय सॅण्ड स्पायडरचे नावही समाविष्ट आहे. या कोळ्याचे वैज्ञानिक नाव सिकेरियस आहे ज्याचा अर्थ 'हत्यारा' आहे.  बऱ्याचदा हे कोळी किडे वाळूमध्ये लपतात. त्यांच्या जवळ कुणीतरी येताच ते एका क्षणात त्यांना आपली शिकार बनवतात.  हे किडे चावल्यानंतर काही तासांच्या आत व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो