सहज मिळणारे स्वयंपाकघरातील 'हे' मसाले रक्तशर्करेवर ठेवू शकतात प्रभावी नियंत्रण ! 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सहज मिळणारे स्वयंपाकघरातील 'हे' मसाले रक्तशर्करेवर ठेवू शकतात प्रभावी नियंत्रण ! 


पुणे - भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांची कमतरता नसते. असे पुष्कळ मसाले आहेत, जे औषधी वनस्पती म्हणून काम करतात आणि हे मसाले आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. खरं तर, भोजनामध्ये वापरले जाणारे काही मसाले रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी काही मसाले खूप फायदेशीर असतात. या आजाराने ग्रस्त रुग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते, जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील, कारण साखरेची पातळी वाढणे अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध होते. यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या काही मसाल्यांचा आहारात समावेश केल्यास साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते मसाले उपयुक्त ठरू शकतात ते जाणून घेऊ या. 

1. लवंग
लवंगाचे औषधी गुणधर्म केवळ पचनशक्ती मजबूत करत नाहीत, तर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. तज्ञांचे म्हणणे आहे की जर मधुमेही रुग्णांनी लवंगाचे पाणी घेतले तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

2. काळी मिरी
हे केवळ भारतातच नव्हे तर जगात लोकप्रिय मसाल्यांपैकी एक आहे. त्याच्या बहुगुणी उपयोगामुळे त्याला 'मसाल्यांचा राजा' असे म्हटले जाते. त्याचा वापर केवळ पचनशक्ती वाढवत नाही, तर कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

3. दालचिनी
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दालचिनी टाईप -२ मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. हे शरीराला रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते. मधुमेही रुग्णांनी आपल्या दैनंदिन आहारात याचा समावेश करणे आवश्यक आहे. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनी घातलेले दूध हा एक सोपा घरगुती उपाय मानला जातो.

4. मेथी दाणे
मधुमेही रुग्णांसाठी मेथीचे दाणे अत्यंत फायदेशीर मानले जातात. त्यात आढळणारे गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. तुम्ही रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिऊ शकता किंवा ते चावून खाऊ शकता. परंतु हे लक्षात ठेवा की मेथीचे दाणे घेण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.