प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं ठरू शकतं आरोग्यासाठी हानीकारक, कसे ?जाणून घ्या !

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं ठरू शकतं आरोग्यासाठी हानीकारक, कसे ?जाणून घ्या !

मुंबई  -

आपण बाहेर गेल्यावर कायम प्लास्टिकची पाण्याची बाटली सोबत ठेवतो किंवा विकत घेतो. पण अशा प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी कितपत चांगलं असतं? याचा आपण फारसा विचार करत नाही. मात्र प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे आपल्यासाठी हानिकारक ठरतं, हे तुम्हाला ठाऊक आहे? नसेल तर जाणून घ्या यामागील करणे. 


० अनेक प्रकारच्या प्लास्टिकमध्ये बिसफेनोल ए (BPA) हे एक घातक रसायन असते. हे पाण्यासोबत मिसळून शरीरात गेल्यास हानीकारक ठरू शकते. त्यामुळे पाण्यासाठी बाटली विकत घेताना ती BPA विरहीत असेल, याकडे लक्ष द्या. बहुतेक प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA असतं. त्यामुळे काचेची बाटली उपयोगी ठरू शकते.

० काचेच्या बाटलीत पाणी कितीही दिवस राहू शकतं, मात्र प्लास्टिकच्या बाटलीत जास्त दिवस पाणी ठेवल्यास त्याची चव बदलते. पाण्याची प्लॅस्टिक बाटली उन्हात ठेवल्यास आणि ते पाणी प्यायल्यास शरीराला घातक ठरू शकतं. कारण सूर्यकिरणांमुळे BPA रसायन पाण्यात तातडीने मिसळलं जातं. त्यामुळे पाण्याची प्लॅस्टिक बाटली वापरणार असाल, तर ती सावलीत ठेवा.

० जर तुम्ही लिंबू पाणी सोबत ठेवत असाल, तर काचेच्या बाटलीचाच पर्याय उत्तम ठरू शकतो. कारण प्लॅस्टिक बाटलीतील रसायनामुळे त्याचा स्वाद बिघडतो. प्लॅस्टिकची बाटली योग्यप्रकारे न धुतल्यास त्यामध्ये जीवाणूंची पैदास होऊ शकते. दुसरीकडे प्लॅस्टिक बाटलीपेक्षा काचेची बाटली स्वच्छ करणं सहज शक्य आहे. लहान मुलांनाही काचेच्याच बाटलीतून दूध पाजणं फायदेशीर आहे.