काजोलची चुलत आजी असलेल्या 'या' सुंदर अभिनेत्रीचा शेवट झाला विदारक !

काजोलची चुलत आजी असलेल्या 'या' सुंदर अभिनेत्रीचा शेवट झाला विदारक !

मुंबई - 

40 आणि 50 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री नलिनी जयवंत यांची आज पुण्यतिथी आहे. 20 डिसेंबर 2010 मध्ये नलिनी यांनी या जगाचा निरोप घेतला. मृत्यूसमयी नलिनी एकट्याच होत्या. त्यांची नीट काळजी घेणारे कोणी नव्हते, त्यामुळे तिचा मृत्यू झाला तेव्हा तिचा मृतदेह तीन दिवस घरातच होता. नलिनी जयवंत यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. 1941 मध्ये आलेल्या 'बेहेन' या चित्रपटातून त्यांना लोकप्रियता मिळाली.

* बाल कलाकार म्हणून पदार्पण
चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण केलेल्या नलिनी यांनी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती, पण शेवटच्या क्षणी त्यांना कुटुंब किंवा चित्रपट जगतातील कोणीही साथ दिली नाही. एकेकाळी यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या नलिनीला अखेरच्या काळात विस्मृतीत जगावे लागले.

* नात्याने होत्या काजोलची आजी  
नलिनी यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२६ रोजी मुंबईत झाला. नात्यात त्या काजोलची आजी लागत. शोभना समर्थ यांच्या चुलत बहीण असलेल्या नलिनी जयवंत यांनी वयाच्या 14 व्या वर्षी 1941 मध्ये 'राधिका' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 50 च्या दशकात ती 'समाधी' आणि 'संग्राम' सारख्या चित्रपटातून त्या टॉप स्टार बनल्या. अशोक कुमारसोबतची त्यांची जोडी चांगलीच गाजली. नलिनी जयवंत आणि अशोक कुमार यांची जोडी 'काफिला', 'जलपरी', 'लकीरें', 'मिस्टर एक्स' आणि 'तुफान में प्यार कहाँ' या चित्रपटांमध्ये दिसली.

* सौंदर्यात मधुबालाला स्पर्धा 
नलिनीही त्या काळातील आघाडीची अभिनेत्री मधुबालाशी स्पर्धा करायच्या. मग ते सौंदर्य असो वा अभिनय. मात्र, 60 च्या दशकापर्यंत नलिनी जयवंत यांना चित्रपटांमध्ये काम मिळणे बंद झाले, त्यानंतर त्यांनी चित्रपट जगतातून निवृत्ती घेतली आणि वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाल्या.

* नलिनीने केली दोन लग्ने
नलिनी यांनी दोन लग्ने केली. पहिले लग्न 40 च्या दशकात दिग्दर्शक वीरेंद्र देसाई यांच्याशी झाले होते. नंतर अभिनेते प्रभू दयाल यांच्याशी त्यांनी दुसरे लग्न केले. पण त्यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी, नलिनी यांचा एक दूरचा नातेवाईक आला आणि नलिनीचा मृतदेह रुग्णवाहिकेत घेऊन गेला. त्या घरात एकट्याच राहत होत्या. शेवटच्या दिवसात खर्च चालवण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते.