12 वीचा निकाल 93.37 टक्के , राज्यात नऊ विभागात तिसऱ्या क्रमांकावर पुणे विभागाचा निकाल

12 वीचा निकाल 93.37 टक्के ,  राज्यात नऊ विभागात तिसऱ्या क्रमांकावर पुणे विभागाचा निकाल

   पुणे, (प्रबोधन न्यूज )  - महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (HSC Result 2023) कधी जाहीर होणार, याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. अशातच आज बोर्डाकडून बारावीच्या निकाल जाहीर (12th Result) करण्यात आला आहे. आज 21 मे 2024 , मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आज अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोर्डाकडून निकाल जाहीर करण्यात आला. पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकाल जाहीर केला.  महाराष्ट्राचा 12 वीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यात पुणे विभागाचा निकाल 94.44 टक्के निकाल लागला आहे. राज्यात नऊ विभागात तिसऱ्या क्रमांकावर पुणे विभागाचा निकाल लागला आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल जाहीर केला. राज्याचा बारावीच्या निकाल 93.37 टक्के निकाल लागला आहे. त्यात एकून नऊ विभाग आहेत. कोकण ,पुणे, कोल्हापूर ,अमरावती ,छत्रपती संभाजीनगर ,नाशिक ,लातूर ,नागपूर ,मुंबई या नऊ विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. 

विभाग निहाय निकाल

पुणे 94.44 टक्के 

नागपूर 92.12 टक्के 

संभाजी नगर 94.080टक्के 

मुंबई 91.95 (सर्वात कमी)

कोल्हापूर 94.24 टक्के 

अमरावती 93 टक्के 

नाशिक 94.71 टक्के 

लातूर 92.36

कोकण 97.51 टक्के 

 पुणे  विभागात विज्ञान शाखेचा निकाल 98.2 टक्के लागला आहे वाणिज्य शाखेचा निकाल 94.9 टक्के, आयटीआय 86.68 टक्के , तर कला शाखेचा निकाल 84.89 टक्के लागला आहे आणि व्यवसाय अभ्यासक्रम 90.16 टक्के निकाल लागला आहे. यात सगळ्यात जास्त विज्ञान शाखेचा निकाल लागला आहे. त्यात 92.62 टक्के मुली आणि 96.64 टक्के मुलांचा समाेश आहे, असा एकून 94.44 टक्के पुणे विभागाचा निकाल लागला आहे. 

15 लाख विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा 

राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांच्या वतीनं नोंदणी करण्यात आलेली होती. बारावीचे विद्यार्थी आणि पालकांची निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.