हिंजवडीत आयटी अभियंत्याची सव्वादोन लाखांची फसवणूक

हिंजवडीत आयटी अभियंत्याची सव्वादोन लाखांची फसवणूक
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - आयटी अभियंत्याला युट्युब चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगत प्रीपेड टास्क देत त्याची दोन लाख 26 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 16 जून रोजी भूमकर चौक, वाकड येथे उघडकीस आली.
अमोल माणिक जाधव (वय 38, रा. भूमकर चौक, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेलिग्राम युजर 7906249035 आणि व्हाटसअप युजर  7974297939 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलवर युट्युब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी फ्री टास्क दिले. त्यानंतर तेच टास्क प्रीपेड दिले. त्यावेळी फिर्यादी यांचा मोबाईल त्यांच्या पत्नीकडे होता. सुरुवातीला किरकोळ रक्कम घेण्यात आली. त्यानंतर मोठ्या रकमेची मागणी झाली. त्यामुळे पत्नीने फिर्यादीस हा प्रकार सांगितला असता फिर्यादीने मोठ्या रकमा पाठवल्या. फिर्यादींनी एकूण दोन लाख 26 हजार 900 रुपये पाठवले. मात्र पैसे पाठवून देखील परतावा मिळाला नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.