इंधन दरवाढीचा युवासेनेतर्फे सायकल रॅलीद्वारे निषेध

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

इंधन दरवाढीचा युवासेनेतर्फे सायकल रॅलीद्वारे निषेध

पुणे – 

केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेच्यावतीने सायकल रॅली काढण्यात आली. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ तातडीने कमी करण्यात यावी, अशी मागाणी यावेळी करण्यात आली. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सारसबाग येथे रविवारी सकाळ पासून भगवे झेंडे लावलेल्या सायकली घेऊन भगवे उपरणे घातलेले युवा सेनेचे शेकडो शिवसैनिक जमा झाले होते. इंधन दरवाढीचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी युवासेना पुणे शहर पदाधिकारी दशरथ खिरीड, राम थरकुडे, चेतन चव्हाण, निरंजन दाभेकर, सनी गवते, श्रावण झगडे, विकास बधे, मयूर पवार आदी उपस्थित होते.

सारसबागेकडून सिलाई चौक, शनिपार, अप्पा बळवंत चौक येथून उजवीकडे वळून फरासखाना, दगडूशेठ मंदिर, समाधान चौक, पुन्हा उजवीकडे वळून लक्ष्मीरोड येथून खंडूजी बाबा चौक या मार्गाने सायकल रॅली काढण्यात आली. इंधन दरवाढीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही झळ नागरिकांना सोसावी लागत आहे. यामुळे केंद्र सरकारने ही दरवाढ रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्‍यक आहे, असे युवा सेनेचे विद्यापीठ कक्ष अध्यक्ष कुणाल धनवडे यांनी स्पष्ट केले.