ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल, डिझेल 20 वेळा महागलं

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल, डिझेल 20 वेळा महागलं


नवी दिल्ली - देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या  दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच राहिली असून, चालू महिन्यातील 20 दिवस दरवाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा  भडका उडाल्याने आता देशातील जनेतला बसणारे इंधन दरवाढीचे चटके वाढू लागले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढल्याने पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम राहण्याची शक्यता आहे. खनिज तेलाचे भाव मागील सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहेत. खनिज तेलाचा भाव वाढल्याने आगामी काळात देशात इंधन दरवाढीचे चक्र कायम राहणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 35 पैशांची वाढ करण्यात आली. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 108.29 रुपये तर मुंबईत 114.14 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 97.02 रुपये आणि मुंबईत 105.12 रुपयांवर पोचला आहे.

देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचे चटके बसत आहेत. देशात 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात 11.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.14 रुपये वाढ झाली आहे. चालू महिन्यात पेट्रोल, डिझेलची दरात 20 दिवस वाढ झाली आहे.

देशात पेट्रोलचा दर विमान इंधनापेक्षा 33 टक्के जास्त आहे. विमान कंपन्यांना ज्या दरात इंधन विकले जाते त्यापेक्षा 33 टक्के जास्त दराने वाहनचालक पेट्रोलची खरेदी करीत आहेत. विमान इंधनाचा दर दिल्लीत प्रतिकिलोलीटर 79 हजार 20 रुपये म्हणजेच 79 रुपये लिटर आहे. यामुळे देशात आता विमान चालवण्यापेक्षा वाहन चालवणे महाग झाल्याची टीका होत आहे. सध्या देशात इंधनाचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत.