10 वी, 12 वी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

10 वी, 12 वी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न
10 वी, 12 वी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न
10 वी, 12 वी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

(जुबेर खान)

पिंपरी, दि. 24 मे – 10 वी 12 वी पास झाल्यानंतर युवकांनी कोणता अभ्यासक्रम निवडावा यासाठी बज्मे फज्ले रसूल या संघटनेतर्फे करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर तवकअल्लाह जामा मस्जिद, नेहरूनगर, पिंपरी येथे दि. 22 मे रोजी घेण्यात आले. या शिबिरात शहनवाझ सय्यद सर, जाफर वाडेकर सर यांनी मार्गदर्शन केले.

या शिबिरात सॉफ्टवेअर, बँकिंग, डेटा सायन्स, इस्लामिक बँकिंग, सीएसएफ, मेडिसिन, इकॉनॉमिक्स या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना या वेळी सविस्तर उत्तरे देण्यात आली व त्यांचे समाधान करण्यात आले.

शहनवाझ सय्यद हे स्वतः डेटा सायंटिस असून ते करिअर व हेल्प अँड डेव्हलपमेंट मध्ये तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. मागील 12 वर्षांत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले, तसेच ते विद्यार्थ्यांना मोफत शिकवतात.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आयतुल्ला सय्यद-अध्यक्ष, बज्मे फज्ले रसूल, जाफर अझिज, मोतसिन दळवी, शाहिद सिद्धीकी, शकील शेख, शहनवाज खान, आरिफ शेख, आदींनी परिश्रम घेतले.