शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणारे दहा नगरसेवक अपात्र

शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणारे दहा नगरसेवक अपात्र


माथेरान - शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या माथेरान नगरपरिषदेच्या दहा नगरसेवकांना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज (ता. २९ ऑक्टोबर) दणका दिला. भाजपवासी झालेल्या या दहाही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिला आहे.
माथेरान नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथस आरोग्य सभापती आकाश कन्हैया चौधरी, नगरसेवक राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव, सोनम दाभेकर, महिला बालकल्याण समितीचे सभापती, प्रतिभा घावरे, शिक्षण समितीचे सभापती, रुपाली आरवाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे या दहा नगरसेवकांवर जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी आपत्रातेची कारवाई केली आहे.