पोलिसांच्या कामगिरीचे वाभाडे काढणाऱ्या चित्र वाघ यांच्या कृतीवर पार्थ पवारांकडून नाराजी

पोलिसांच्या कामगिरीचे वाभाडे काढणाऱ्या चित्र वाघ यांच्या कृतीवर पार्थ पवारांकडून नाराजी
पिंपरी -

तळेगांव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीवर भरदिवसा हातोडा घालून हल्ला करण्यात आला. याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच हा हल्ला झाल्याची टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर केली. तर पार्थ पवार यांनी या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, अल्पवयीन मुलीला सतत एका माथेफिरूकडून त्रास दिला जात होता. त्याच्या वांरवार पोलिस स्टेशनला तक्रारी दिल्या. पोलिसांनी ना दखल घेतली, ना कारवाई केली. भरदिवसा बाजारात संबंधित माथेफिरूने मुलीच्या डोक्यात हातोडा मारला. पोलिसांनी त्वरित दखल घेतली असती तर हा हल्ला टाळता आला असता. तात्काळ निष्क्रीय पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

यावर पार्थ पवार म्हणाले की, तळेगाव दाभाडे येथे छेडछाडीची तक्रार करणाऱ्या अल्पवयीन युवतीवर हल्ला होणे ही अस्वस्थ करणारी घटना आहे. या भीतीनेच तक्रार देण्यास टाळाटाळ होते. तक्रार दिल्यावर संरक्षण मिळेल ही खात्री आता करावी लागेल. गुन्हा नोंदवण्यास महिलेने पुढे यायला अपार धैर्य लागते. त्यांना निराश करून चालणार नाही.