यूपीमध्ये शामलीच्या बुटरडा येथे फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, अनेक कामगारांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या !

यूपीमध्ये शामलीच्या बुटरडा येथे फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, अनेक कामगारांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या !


शामली - 


शामलीतील बुटरडा गावात एका फटाक्यांच्या कारखान्यात सोमवारी दुपारी भीषण स्फोट झाला. या अपघातात अनेक मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास करून मदतकार्य सुरू केले. स्फोट इतका जोरदार होता की अनेक मजुरांच्या मृतदेहाचे तुकडे झाले.या अपघातात नेमके किती कामगार मरण पावले याची अद्याप माहिती मिळाली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, शामलीच्या बुटरडा गावात सोमवारी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. भीषण स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरला. माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी स्फोटाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघाताची माहिती घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाके बनवताना कारखान्यात स्फोट झाला. या अपघातात अनेक कामगारांना जीव गमवावा लागला आहे. हा अपघात किती भीषण होता, याचा अंदाज अनेक मजुरांच्या मृतदेहाच्या चिंधड्या उडून दूरवर पडला यावरूनच लावता येतो.