अजित पवारांचे 'अतिथी देवो भव !' स्वत:चा राखीव सूट अमित शाहांना मुक्कामासाठी दिला
![अजित पवारांचे 'अतिथी देवो भव !' स्वत:चा राखीव सूट अमित शाहांना मुक्कामासाठी दिला](https://www.prabodhannews.com/uploads/images/2021/12/image_750x_61bdb32d5f71f.jpg)
अजित पवार यांनी स्वत: साठी राखीव असलेला सूट गृहमंत्र्यांसाठी दिला आहे. अमित शाह यांच्या कार्यालयानं खासगी ठिकाणी मुक्कामाची सोय नको असं जिल्हा प्रशासनाला कळवलं होतं. पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये दोन सुट आहेत त्यापैकी एक सुट कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना राखीव असतो. तर,दुसरा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासाठी राखीव असतो. अजित पवार याच दालनात अजित पवार बैठक घेत असतात. मात्र, अमित शाह यांच्या कार्यालयाकडून खासगी हॉटेलमध्ये मुक्काम नको हे कळवल्यावर ही गोष्ट अजित दादांच्या कानावर जाताच त्यांनी त्यांचा सूट अमित शहांना मुक्कामासाठी दिलाय.
खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीव्हीआयपी सर्किट हाउसमध्ये त्यांच्या ताब्यातील सूट उपलब्ध करून दिलाय. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असल्याने हा सूट त्यांना देण्यात येतो. अजित पवार दर शुक्रवारी, शनिवारी याच ठिकाणी बैठका घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे देण्यात आली. अमित शाह यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत.