माझा विजय पक्का, प्रत्येक विधानसभेतून पन्नास हजारांचे मताधिक्य - संजोग वाघेरे पाटील  

माझा विजय पक्का, प्रत्येक विधानसभेतून पन्नास हजारांचे मताधिक्य - संजोग वाघेरे पाटील   

 

 

- श्रीरंग बारणेंनी त्यांना दोन वेळा खासदार करणा-या नेतृत्त्वाशी गद्दारी केली - वाघेरे

 

 पिंपरी (प्रबोधन न्यूज ) - एका पक्षातून दुस-या पक्षात जाणे. याला गद्दारी म्हणता येत नाही. त्याचा सर्वांना अधिकार आहेत. परंतुमावळमध्ये ज्यांना दोन वेळा शिवसेना पक्षाने आणि उद्भव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेतृत्त्वाने संधी देवून खासदार केले. त्या नेतृत्त्वाशी गद्दारी करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून माझा विजय पक्का आहे.  प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मला 50 हजारांचे मताधिक्य मिळेलअसा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

 पिंपरीत  शनिवारी (दिनांक 11 मे) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ते पुढे म्हणाले कीमला कोणत्या पक्षातून आलेअसा प्रश्न विचारणा-यांनी स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे. ते स्वतः काचेच्या घरात राहतात. कारणआपण कुठे होतो. कसे खासदार झालोहे त्यांनी पाहिले पाहिजे. उद्भव ठाकरे साहेब यांच्या आशिर्वादामुळे शिवसेना पक्षाने त्यांना दोन वेळा खासदार होण्याची संधी दिली. ज्या नेतृत्त्वाने आपल्याला संधी देवून दोन वेळा खासदार करून मोठे केले. त्यांच्यासोबत त्यांनी जे केले. ती गद्दारी आहे. ते यापूर्वी काँग्रेसमधूनच शिवसेनेत आले होते. मी देखील स्वाभीमानाने पक्ष बदलून इकडे आलो. विचार आवडल्यामुळे त्यांच्यासोबत आहे. मागच्या दाराने कुठेही गेलो नाही. कोणालाही फसवलेले नाही. मला ओळखत नाहीअसे म्हणणा-यांना आता माझ्या विरोधात प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना चार तास मतदारसंघांमध्ये रोड शो करण्यासाठी बोलवावे लागत आहे. सगळे मोठे मोठे मंत्री त्यांना आणावे लागले. त्यांना आता तरी माझी ओळख झाली आहे.

मतदारसंघांमध्ये गावागावापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. दोन es जिल्ह्यांमध्ये विभागलेल्या या मतदारसंघात वेगवेगळ्या समस्या आहेत. घाटाखाली अनेक मतदारांनी खासदार कधी फिरकले नाहीत,असे सांगितले. मुंबईला लागून असलेल्या पनवेलउरणकर्जतखोपोलीसारख्या ठिकाणी रस्तेपाणीआरोग्यासारख्या समस्या आहेत.  तिथे प्रॉपर्टी टॅक्सचा विषय आहे. उरण परिसरात काही कारखान्यांचे प्रश्न आहेत. लोणावळाखंडाळा भागात वाहतुकीचा प्रश्न बिकट बनत आहेत. मतदारसंघात कार्लाभाजे लेणीएकविरा मंदिरलोणावळ्यातील निसर्गरम्य स्थळेमाथेरानसारखी अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्याकडे लक्ष देवून पर्यटनाला चालना देण्याचे आपले उदिष्ट आहे.

 मतदारसंघांमध्ये यापूर्वी काही मंडळींनी ज्या घोषणा केल्या होत्या. त्या त्यांना पूर्ण करता आलेल्या नाहीत. कुठल्याही बाबतीमध्ये पूर्तता झालेली दिसत नाही. हेच प्रत्येक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी आमच्याशी चर्चा करताना सांगितले. तुम्ही पहिल्यांदा आमच्या गावामध्ये आमच्या पाड्यावरती आमच्या वस्तीवरती आला आहात. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने या. आम्ही तुमच्यासोबत असल्याचा विश्वास प्रत्येक ठिकाणी मतदारांनी दिलेला आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात माझा विजय पक्का आहे.  प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून किमान पन्नास हजारांचे मताधिक्य आपल्याला मिळणार आहे. ते 4 जून रोजी मतपेटीतून उघड होईलअसे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.

 या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवारशहरप्रमुख अॅड. सचिन भोसले,  मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबरसुरेश वाडकर आदी उपस्थित होते. यावेळी मावळ लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत लोणावळा नगरपरिषदेचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनिल इंगुळकर यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

 टीडीआरस्मार्ट सिटीच्य़ा तक्रारींचे काय झालं ? : संजोग वाघेरे

महापालिकेच्या माध्यमातून होणा-या चुकीच्या कामांना आळा घालणेही प्रत्येक लोकप्रतिनिधीची देखील जबाबदारी असते. खासदारांनी टीडीआरस्मार्ट सिटीसारख्या कितीतरी कामांबाबत महापालिकेकडेशासनाकडे पत्रे दिली होती. त्या पत्राचे काय झाले. त्या प्रकरणावर खासदार पुन्हा का बोलले नाहीतअसे म्हणत खासदार श्रीरंग बारणे यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांवर संजोग वाघेरे पाटील यांनी संशय व्यक्त केला.