कोविडमधील मृतांच्या टाळुवरील  लोणी खाणाऱ्यांचे सगळे धंदे उघड करणार माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्यावर संतोष निसर्गंध यांचा हल्लाबोल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कोविडमधील मृतांच्या टाळुवरील  लोणी खाणाऱ्यांचे सगळे धंदे उघड करणार माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्यावर संतोष निसर्गंध यांचा हल्लाबोल


पिंपरी, (प्रबोधन न्यूज)– पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ठेकेदारांना ब्लॅकमेल करून स्वत:चे घर चालविणाऱ्यांचे सर्व धंदे पुराव्यासह उघड करणार असून कोविडमधील मृतांच्या टाळुवरील लोणी खाणारे, रेमडिसवीर इंजेक्शन चोरणाऱ्यांचा व महापालिकेतील ठेकेदारांना ब्लॅकमेल करणाऱ्यांचा पुराव्यासह पर्दाफाश करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या झोपडपट्टी सेलचे शहराध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बिनबुडाची टीका करणाऱ्या माजी नगरसेवक तुषार कामठे यांना प्रत्युत्तर दिले आहे.


पिंपरी-चिंचवड शहराचे विकासपुरुष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओळख आहे. मात्र, राजकारणात स्थिरावण्यासाठी रोज उठसूठ बिनबुडाचे आरोप करून प्रसिद्धी मिळविणाऱ्या तुषार कामठे यांनी अजितदादा पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले होते. याला आता संतोष निसर्गंध यांनी उत्तर दिले आहे. याबाबत निसर्गंध यांनी एक पत्रक प्रसिद्धी दिले असून त्यात म्हटले आहे की, राजकारणात नवखे असलेल्या आणि प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करणाऱ्या तुषार कामठे यांचे सर्व उद्योग शहरातील अनेकांना माहिती आहेत. ज्या अजितदादांनी या शहराला देशातील एक सर्वांगसुंदर आणि विकसीत शहर बनविले त्या अजित दादांवर तुषार कामठे सारख्या  ब्लॅकमेलरने टिका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. 


1991 पासून पिंपरी-चिंचवड शहराला स्वत:चे शहर माणून अजितदादांनी मेट्रोसिटी म्हणून नावारुपाला आणले ही वस्तुस्थिती आहे. शहरातील जुन्या जाणत्या विरोधकांनाही हे मान्य आहे. मात्र, राजकारणात नवख्या असलेल्या आणि राजकीय दुकानदारीवर घर चालविणाऱ्यांना आणखीन राजकारण कळण्यापूर्वीच आपण मोठे नेते झाल्याची स्वप्ने पडू लागली आहेत. ज्यांनी तुषार कामठे यांना राजकारणात आणले त्या दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्यावर आणि ज्या पक्षाने त्यांना संधी दिली त्या भाजपवरही याच तुषार कामठे यांनी आरोप केले होते. जिथे खोबर, तिकडं चांगभल’ ही प्रवृत्ती असलेल्या कामठे यांचे सर्व धंदे जगासमोर आणणार असल्याचेही निसर्गंध यांनी पत्रकात म्हटले आहे.


‘स्पर्श’चे लाभार्थी कोण ते पुराव्यासह समोर आणणार
स्पर्श हॉस्पीटलच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेला साडेतीन कोटींचा गंडा कोणी घातला हे सर्वांना माहिती आहे. स्पर्श हॉस्पीटलचे संचालक विनोद आडसकर यांच्या मोबाईला ‘डीसीआर’ आम्ही मागविणार असून त्याद्वारे कोविडच्या लाभार्थ्यांची नावे उघड करणार आहोत. याशिवाय ॲटो क्लस्टर येथे कोविडच्या माध्यमातून महापालिकेने कोविड रुग्णालय उभारले होते. या ठिकाणची 28 रेमडिसीवीर इंजेक्शनची चोरी झाली होती, त्यामध्ये ज्या दोन तरुणांना नाहक गुंतविले होते, त्यांचीही चौकशी करून इंजेक्शन चोर कोण होते ते देखील उजेडात आणले जाणार असल्याचे निसर्गंध यांनी म्हटले आहे.
ब्लॅकमेल झालेल्या ठेकेदारांची परेड होणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करणाऱ्या अनेक ठेकेदारांना पिंपळे निलख परिसरात बोलावून कोणते महाशय ब्लॅकमेल करत होते त्यांचे फोन रेकॉर्डींग आणि मॅसेजचा डेटा जमा करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. या ठेकेदारांच्या मोबाईचे डीसीआर काढण्यात येणार आहेत. त्या मोबाईचे संभाषण आणि मॅसेजचा डेटा आम्ही जनतेसमोर उघड करणार असून या ठेकेदारांनी कोणाला रक्कम दिली हे देखील पुराव्यासह जाहीर करणार आहोत. अनेक ठेकेदार समोर येण्यास तयार असून पुढील काही दिवसांत सर्व पोलखोल पुराव्यास करणार असून संत तुकाराम नगर येथील ज्या बँकेतून स्पर्श हॉस्पीटलचे व्यवहार झाले त्याचीही माहिती गोळा करून जनतेसमोर आणणार असल्याचा इशाराही निसर्गंध यांनी दिला आहे.