अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  अज्ञात वाहनाच्या धडकेत 53 वर्षीय पादाचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात महाळुंगे येथे गुरुवारी (दि.24) सकाळी घडला.

यात रामदास रतन गवई (वय 53 रा. निघोजे, खेड) अये मयत व्यक्तीचे नाव असून सचिन मनमोहन देऊळकर (वय 26 रा.महाळुंगे) यांनी महाळुंगे एमआयीडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अत्रात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवई हे पायी चाकण तळेगाव रोडने जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील अज्ञात वाहन वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत वेगाने चालवले.यात त्याने गवई यांना जोरदार धडक दिली ज्यात ते गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला.यावरून महाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.