पोलिसात तक्रार दिल्याने हल्ल्याचा प्रयत्न

पोलिसात तक्रार दिल्याने हल्ल्याचा प्रयत्न

पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -    पोलिसात तक्रार दिल्याचा राग मनात धरून तरुणावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री डांगे चौक, थेरगाव येथे घडली.

शिवम सिकंदर सिंग (वय 32, रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल दामोदर पिल्ले (वय 24), सोहम दिनेश पाटील (वय 21, दोघेही रा. डांगे चौक, थेरगाव) आणि त्याचा एक साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिल्ले आणि पाटील यांच्या विरोधात फिर्यादी शिवम याने पोलिसांना तक्रार दिली होती. याचा राग मनात धरून आरोपींनी आपसांत संगनमत करून शनिवारी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास डांगे चौक, थेरगाव येथे फिर्यादी शिवम यांना शिवीगाळ करीत हाताने व लाथा-बुक्‍क्‍याने मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपी पिल्ले याने फिर्यादी यांच्या डोक्‍यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादी यांनी तो वार चुकविला. जर त्यांच्या डोक्‍यावर वार झाला असता तर त्यांचा जीवही गेला असता त्यांची कल्पना आरोपी पिल्ले याला असूनही त्याने हे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.