लग्नात संगीत वाजवले म्हणून तालिबान्यांनी केली 13 जणांची हत्या

लग्नात संगीत वाजवले म्हणून तालिबान्यांनी केली 13 जणांची हत्या

काबूल -

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे. काही दिवसांपूर्वी तालिबान्यांनी एका लग्नात संगीत वाजवले म्हणून त्या लग्नातील 13 जणांची हत्या केली आहे. नांगरहार प्रांतात ही भयंकर घटना घडली आहे. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच अफगाणिस्तानातील या परिस्थितीला पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप देखील त्यांनी या ट्विटमधून केला आहे.

तालिबान्यांनी लग्नाच्या पार्टीत संगीत वाजवले म्हणून 13 जणांचे हत्याकांड घडवले आहे. आपण फक्त निषेध नोंदवून याबद्दलचा आपला राग व्यक्त नाही करू शकत. गेली 25 वर्ष पाकिस्तान या तालिबान्यांना मारण्याचे प्रशिक्षण देत आहे. आमच्या देशाला त्यांच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आयएसआयने हे सर्व घडवले आहे. आम्ही असे होऊ देणार नाही. मात्र तोपर्यंत अफगाणी नागरिक त्याची किंमत चुकवतील’, असे अमरुल्लाह सालेह यांनी ट्विट केले आहे.