दानशुरांच्या यादीत अझीम प्रेमजी अव्वल स्थानी

दानशुरांच्या यादीत अझीम प्रेमजी अव्वल स्थानी

नवी दिल्ली - देशातील दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी पुन्हा दुसऱयांदा समाजकार्यात दान करण्यात अव्वलस्थानी राहिले आहेत. यामध्ये आर्थिक वर्ष 2020-21 च्या दरम्यान प्रेमजी यांनी 9,713 कोटी रुपयाचे दान केले आहे. प्रतिदिन हिशोब पाहिल्यास हा आकडा 27 कोटी रुपये होत असल्याची माहिती आहे. एडलगिव हुरुन इंडिया फिलैन्थ्रॉपी 2021 ची यादी नुकतीच सादर करण्यात आली  आहे.

सदरच्या यादीत 9,713 कोटी रुपयाचे दान देण्यासोबत अझीम प्रेमजी अव्वल स्थानावर राहिले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत अझीम प्रेमजी यांनी दान द्यायच्या रक्कमेत जवळपास 23 टक्क्यांची वाढ केली आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशनने दहा राज्यांमध्ये लसीकरणावर काम करण्यासोबत विस्तारीकरणासाठी प्रयत्न करण्यासाठी आपल्याकडून देण्यात येणाऱया रक्कमेत वाढ केली आहे. ती 1,125 कोटी वरून 2,125 कोटी रुपये केली आहे.

वर्ष 2020-21 आकडेवारी

1.     अझीम प्रेमजी……………… 9,713 कोटी रुपये
2.     शिव नाडर ऍण्ड फॅमिली…. 1263 कोटी रुपये
3.     मुकेश अंबानी ऍण्ड फॅमिली 557 कोटी रुपये
4.     कुमार मंगलम बिर्ला ऍण्ड फॅमिली       377 कोटी रुपये
5.     नंदन नीलेकणी…………….. 183 कोटी रुपये
6.     हिंदुजा फॅमिली……………. 166 कोटी रुपये
7.     बजाज फॅमिली…………….. 136 कोटी रुपये
8.     गौतम अदानी ऍण्ड फॅमिली   130 कोटी रुपये
9.     अनिल अग्रवाल ऍण्ड फॅमिली  130 कोटी रुपये
10.    बर्मन फॅमिली      - 114 कोटी रुपये